मला प्रचंड ॲनिमल फोबिया आहे
तसे इतरही बरेच फोबिया आहेत जसं Dance-o-phobia, Dentophobia वगैरे वगैरे. Dentophobia तर इतका कि मी अगदीच असह्य झाल्याशिवाय dentist गाठत नाही. Stich in time saves nine वगैरे मला पाठ आहे आणि वेळेवर आठवतही फक्त ते या अशा फोबिया केसेस मधे वळत नाही. एकदा तर रुट कॅनलने दाढ वाचेल अस निदान होऊनही केवळ त्या डेंटिस्टच्या चेअरवर किमान तीन वेळा बसाव लागेल म्हणून मी एका सिटिंगमधे होणारा पर्याय निवडून "काढून टाका ती दाढ" अस म्हणत आमच्या जुन्या फॅमिली डेंटिस्टना हैराण केलं होतं.
तर असो ते डेंटोपुराण. ॲनिमल फोबिया हा त्याहून वरच्या लेव्हलचा आहे. लांबून मला प्राणि दया, ओह छो छ्विट वगैरे म्हणायला जमतं. मी ॲनिमल हेटर नाहीये पण त्यांची भिती इतकी आहे कि मी आणि ते एका खोलीत एका घरात एका सर्कलमधे आलो तर मी गायब व्हायच पोशन आहे का शोधते. बुद्धीबळ खेळाव तस मी इकडून गेले तर चेक मेट टळेल कि तिकडून या विचाराने रेस्टलेस होते.
लेक तर प्रचंड प्राणीप्रेमी. तिला कुत्रा मांजर घरात आणायचय कधीचं. खरतर तिला आवडणारा प्राणी आहे 'फॉक्स', पण आईच्या फोबियाची कल्पना असल्याने ती तो पाळूया का अस उघड उघड विचारत नाही इतकच.
तस अजूनही मी तिला कुत्रा मांजर पाळायला ग्रीन सिग्नल दिला नसला तरी कधीच मनात होतं कि हे अस इतकं घाबरणही काही बर नव्हे.
आज सकाळी चालायला गेले तेव्हा आमच्या कॉलनीतला लाल्या कुत्रा स्वागताला गेटवरच होता बागेच्या. एरव्ही लाल्या तसा शांती प्रिय आहे म्हणे पण आमच्या शेजाऱ्याने त्याच्या लाडक्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवला होता तेव्हा शेजारी त्या व्यक्तीवर अटॅक करतोय अस वाटून म्हणे लाल्या शेजाऱ्याला चावला होता. त्याच्या गैरसमजाची शिक्षा शेजाऱ्याला आणि भितीत वाढ मात्र माझ्या असा लोचा असताना लाल्या एकदम समोर कि आला आज. मी श्वास रोखून इकडून चेकमेट टळेल कि तिकडून या विचारात आणि लाल्या मात्र माझ्या गार पडलेल्या हाताला नाक लावत उभा तिथे.
मनाचा हिय्या करुन मी त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला (ज्याला हा फोबिया आहे तोच जाणेल हे हिय्या करण म्हणजे खतरों के खिलाडीची अंतीम फेरी गाठण्यासारख आहे)
थोडावेळ लाल्याने असे लाड करुन घेतले. हाताचा वास घेऊन झाला आणि मग लाल्याशेट माझ्या पायाला टेकून उभे राहिले. मी जागा बदलली कि परत येऊन पाठ टेकून तोंडाने ऊम्म म्हणत माझा हात डोक्यावर फिरायची वाट बघत लाल्या तिथेच उभा. अस थोपटून घेणं आवडल्याच आणि त्याने माझ्यावर विश्वास टाकल्याच त्याच्या बॉडी लॅंग्वेजमधून कळत होतं.
विश्वास टाकण्यावरुन आठवलं, I have developed trust issues over couple of years. म्हणजे पूर्वी मी "चोरी सिद्ध होई पर्यंत समोरच्याला क्लिनचिट द्यायचे किंवा बेनेफिट ऑफ डाऊट वगैरे" आता "चोर नाही सिद्ध झाल्यावर व्यक्ती ट्रस्टेड लिस्टमधे शिफ्ट होते" आणि हे अंध विश्वास ते डोळस विश्वास असं हेल्दी ट्रान्झिशन नाहीये हे नक्की. लोकं याला अनुभवाने आलेलं शहाणपण म्हणोत पण एका पॉईंटला मला असा स्वभाव होत जाण्याची भिती वाटते. I was optimistic and I wanted to be optimistic by heart mind and brain. बऱ्याच जणांना वाटतं मला खूप मित्र मैत्रिणी आहेत. माझं फ्रेंड सर्कल खूप मोठ आहे. I can easily mingle with all पण हे तितकही खरं नाहीये. म्हणजे मी माझ्यात बरीच कुंपणं घालून घेतली आहेत. बरेच ओळखदेख असलेले हे अगदी बाह्य वर्तुळात असतात. या कुंपणाच्या अलीकडे असलेले तसे कमी आहेत आणि त्याही आत अगदी close to heart असलेल्यांची संख्या अजूनच कमी आहे. काही गेट्स तर अशी आहेत ज्याला कुलूप लावून किल्ली मी स्वत:च लांब फेकून दिलेय समुद्रात.
इतके ट्रस्ट इश्यू मला असताना लाल्या मात्र नुसत्या दोन मिनिटाच्या थोपटण्याने माझ्यावर विश्वास टाकून मोकळा झाला पण. माझ्याकडून धोका जाणवला तर लाल्या मला कधीही इंजेक्शन घ्यायची वेळ आणू शकतो पण मी धोकाच देईन अस मानून तो विश्वास टाकायच थांबवत तरी नाहीये.
ॲनिमल फोबियावर काम करायल सुरुवात करताना लाल्याने मला जाणवून दिलं कि u can trust anyone because u have the power to bite and fight if required. ;)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा