'धबधब्याखाली दहा वाजता. Belated celebration..' इतका तूटक निरोप कोणी देत का? पण या मन्याच सगळं असच असत. मोजकच बोलणार आणि नेमकच बोलणार. बर जमत याला अस नाहीतर मी, अघळपघळ. एका वाक्यातल्या उत्तराकरताही अख्ख पानभर खरडणार. बरं निरोप धाडलान तसं उत्तरही ऐकून जायच ना माझं? ते नाही. पलट निरोपाची काही सोयच नाही. स्वत: जाऊन उभा राहील तिथे डॉट दहाला. प्रॉब्लेम माझाच आहे. त्यात इतर कोणता दिवस असता तर ठिक होतं. आज जमवायच जरा कठीणच आहे. घरात पाहुणे जमलेत. बाबा तिकडे बाहेर हॉलमधे
व्यवस्था बघतायत. आईला आज किचन पुरुन उरणार आहे. पिंट्याची एकट्याची धावपळ सकाळपासून, आई म्हणे अरे जरा दूधवाल्याला फोन कर आणि दोन दिवस जास्तीच दूध टाकायला सांग. बाबा म्हणे, पिंट्या गुरुजींना फोन कर. सामानाची यादी चेक कर. मी आपली घरात एका कोपऱ्यात बसून आहे. मला तिथून उठून जायची परमिशन नाहीये किमान पुजा होई पर्यंत तरी. सोवळ ओवळ एरव्हीही असतच आजीच पण आता जरा जास्तच काक नजर तिची सगळ्यांवर. आई दिव्यात तेल घालायला आली तेव्हा तिचा उजवा डोळा लवतोय का बघायची उगीचच इच्छा झाली. तितक्यात सुमाक्काने आईला हाक मारली. "मावशी या दोन दिवसाच्या भाज्या निवडून ठेवल्यात. निघू मी?" म्हणत आईच्या चहा तरी घेऊन जा या वाक्यावर मानेनेच नको म्हणत आजीने टोकायच्या आत निघूनही गेली. आजीच्या तावडीत सापडती तर वाटच होती तिची हे गो काय नखरे केस बांधून ना कराव काम अस वर ऐकाव लागल असत तिला. पण आज ती होती म्हणून आईला मदत तरी होत होती. माझा इथे बसून काहीही उपयोग होण्यासारखा नव्हता तसाही. पण इथून निघायचीही परमिशन नव्हती. हे सगळ मन्याला सांगायच होतं पण
आहे कुठे तो इथे?तो जाऊन बसला असेल तिथे धबधब्याखाली.
समोर असता तरी म्हणाला असता "ना माझा विश्वास आहे या सगळ्यावर ना माझ्या घरच्यांचा"
विश्वास तर माझाही नव्हता रे पण तरी का कोण जाणे पाय निघत नाहीये इथून. पहिल्यांदाच ऐकाव वाटतय घरच्यांच. कोपऱ्यात बसून का होईना पण हे सगळं बघाव वाटतय.
पण हे सगळं बोलायला भेटायला तर हवा तो. तो तर आत्तापर्यंत पोहोचला असेल तिथे धबधब्याखाली.
नेहमीची सवय आहे हि त्याची. त्यादिवशीही असच केल त्याने. एक sms तेव्हढा केला हा असाच आजच्यासारखा 'धबधब्याखाली १० वाजता see u - love'
त्याला आमची प्रपोज ॲनिव्हर्सरी त्याच स्पॉटला साजरी करायची होती जिथे त्याने प्रपोज केलं होतं.
पावसाने जोर धरला होता आई म्हणाली होती नको बाहेर पडूस आज. जीव घाबरा होतो अशा पावसाने त्यात उजवा डोळा फडफडतोय सकाळपासून.
आई ग कसल्या अंध्रश्रद्धा बाळगून आहेस म्हणत हसून आलेच जाऊन म्हणत निघाले ॲक्टिव्हा घेऊन.
दोन गल्ल्यापुढे मन्याला पिक अप केलं. पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. मन्या माझ्या कानात काहीतरी बोलत होता. काहीतरी इंटिमेट असं. पावसाच्या आवाजात शब्द नीट कळत नव्हते. धबधबा आता अगदी जवळ आला होता. समोरच्या उजव्या वळणावरुन एक अर्धा किलोमीटर आत गेलं कि आलाच धबधब्याकडे जाणारा रस्ता. उजव्या वळणावर गाडी व्यवस्थित इंडीकेटर देऊन वळवली मात्र समोरुन एक ट्रक इतक्या झपकन आला कि धस्स झालं एकदम. तिथेच थांबाव लागलं. गाडी स्किड झाली. ट्रकवाला आमच्या समोरुनच पळून गेला. बऱ्याच वेळाने त्या रस्त्याला गाडी आल्यावर मदत मिळाली. आमचं सेलेब्रेशन अर्धवटच राहिलं. तेच साजर करायला तो भेटायचा निरोप. मन्या जाऊन पोहोचला असणार खात्रीने. पण मी कशी निघू इतक सगळ होऊन गेल्यावर आई बाबांना न सांगता ते हि माझ्याच दहाव्याची तयारी सुरु असताना. मी नाही निघू शकत. सगळं आटपेपर्यंत, गुरुजी असेपर्यंत, आईचे अश्रू सुकेपर्यंत.. पिंट्या कर्ता होई पर्यंत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा