बुधवार, १८ फेब्रुवारी, २००९

आठवणी

आठवणी ठेवाव्यात जपून
मनाच्या कोपर्‍यात दडवून
पहावे त्याकडे न्यहाळून
आपणच अलिप्त राहून

आठवणी ठेवाव्यात
स्मृतीछटेत रंगवून
अन सरते शेवटी
जावे विरून
आठवणींच्या गाभार्‍यात
आठवणी बनून

1 टिप्पणी:

  1. आठवणी कधी…

    आठवणी कधी…
    चिंब होवून हसतात
    कधी चिंब होवून रडतात…

    आठवणी कधी…
    अल्हाददायक असतात
    कधी बोचरया,
    तर कधी नुसत्याच आठवणी असतात…

    आठवणी कधी…
    प्रेमाच्या असतात
    मैत्रीच्या, कधी द्वेशाच्या
    तर कधी फक्त नात्यांच्या असतात…

    आठवणी कधी…
    अफाट आभाळाच्या असतात
    आकाशातल्या निवडक रंगछटांच्या
    तर कधी न संपणार्या आकाशा येवढ्या असतात…

    आठवणी कधी…
    सळसळणार्या झर्याच्या असतात
    उथळ वहाणार्या नदीच्या
    कधी संथ सरोवराच्या निळशार रंगाच्या
    तर कधी महासागराच्या खोली एवढ्या असतात…

    आठवणी कधी…
    वार्यासारख्या बेभान होतात
    कधी पर्वतासारख्या निश्चल
    तर कधी सुकलेल्या पानासारख्या नुसत्याच झुरतात…

    आठवणी फक्त आठवणीच असतात…
    सुख दुखाच्या हिंदळ्यावर नेहेमीच झुलवतात
    अवती भवती फक्त आभास निर्माण करतात
    आणि आपला वर्तमान हिसकावून नेतात…

    उत्तर द्याहटवा