काय गं रायटर्स ब्लॉक सतावतोय का?
काही लिहीलं नाहीस बरेच दिवसात?
तिच्या प्रश्नावर माझा मोठ्ठा पॉज
काय सांगणार तिला?
पुर्वी बरच काही खदखदायचं
एका क्षणी मग उतु जायचं
तितक्या तीव्रपणे आता
खदखदतच नाही
मनाचा तळही
ढवळून निघत नाही
तू म्हणतेस,
"काही लिहिलं नाहीस बरेच दिवसात?"
आणि आई म्हणते,
"रुळली माझी बाय शहरात"
काही लिहीलं नाहीस बरेच दिवसात?
तिच्या प्रश्नावर माझा मोठ्ठा पॉज
काय सांगणार तिला?
पुर्वी बरच काही खदखदायचं
एका क्षणी मग उतु जायचं
तितक्या तीव्रपणे आता
खदखदतच नाही
मनाचा तळही
ढवळून निघत नाही
तू म्हणतेस,
"काही लिहिलं नाहीस बरेच दिवसात?"
आणि आई म्हणते,
"रुळली माझी बाय शहरात"
खरय...
उत्तर द्याहटवाअसं झालय खरं ! माझंही.. :(
गेल्या कित्येक दिवसांत कवितेला (तू नव्हे :P ) हातही लावलेला नाहीये. असेलही कदाचित ब्लॉक :)