जाऊ दे जळून । अमंगल सारे।
रुजू दे विचार । मांगल्याचा॥
क्षमा अनुकंपा । कणा जीवनाचा।
कळोनी वळावे । माझ्या मना॥
मत्सराचे विष । सर्वांत जहाल।
होईल निष्प्रभ । तुझ्या कृपे॥
चुका ह्या होतात । पदोपदी माझ्या ।
बुद्धी दे त्यातून। शिकण्याची॥
हाची आशीर्वाद । द्यावा मला देवा ।
दांभिकता मना । शिवू नये॥
एक विनवणी । तुझ्या चरणाशी ।
वृथा अहंकार । लोप पावो ॥
चुकले माकले । लेकराचे काही ।
सांभाळूनी घ्यावे । देवा तुची ॥
यथामती केली । प्रार्थना जी देवा ।
मानुनिया गोड । स्वीकारावी ॥
रुजू दे विचार । मांगल्याचा॥
क्षमा अनुकंपा । कणा जीवनाचा।
कळोनी वळावे । माझ्या मना॥
मत्सराचे विष । सर्वांत जहाल।
होईल निष्प्रभ । तुझ्या कृपे॥
चुका ह्या होतात । पदोपदी माझ्या ।
बुद्धी दे त्यातून। शिकण्याची॥
हाची आशीर्वाद । द्यावा मला देवा ।
दांभिकता मना । शिवू नये॥
एक विनवणी । तुझ्या चरणाशी ।
वृथा अहंकार । लोप पावो ॥
चुकले माकले । लेकराचे काही ।
सांभाळूनी घ्यावे । देवा तुची ॥
यथामती केली । प्रार्थना जी देवा ।
मानुनिया गोड । स्वीकारावी ॥
रोज नवी प्रार्थना म्हणणे केंव्हाही चांगलेच.
उत्तर द्याहटवाही प्रार्थनाही आवडली.
पण सदा नम्र वाचे वदे....
असे राहण्याने ’स्वधर्म’ हातातून निसटतो.
म्हणून
http://nvgole.blogspot.in/2009/08/blog-post_30.html#links
प्रमाणामध्ये सर्व काही असावे.
uttam te saare!!
उत्तर द्याहटवाdharave manaat ..!!
tyajaave anitya ..
manobhaave...!!
--------------------harshal
mast lihilay ....kavita tai tumhi..!!