करिते मी धावा । संकट निवारा ।
भयमुक्त करा । गजानना ॥
चिंता क्लेष माझे । जाणसी तू सारे ।
रक्षण करावे । विघ्नहारा ॥
थकले हारले । मोडून पडले ।
शरण मी आले । सावरावे ।
ठरेना वादळ । भरकटे तारु ।
सुखरुप न्यावे । पैलतिरा ॥
तुच माझा राम । तुच माझा शाम ।
सगुण स्वरुप । चैतन्य तू ।
स्विकारुनी सेवा । आशिर्वाद द्यावा
सुखी व्हावे सर्व । आप्तजन ॥
सहज सुचतंय तेही उत्तमच आहे!
उत्तर द्याहटवास्विकारुनी सेवा । आशिर्वाद द्यावा
सुखी व्हावे सर्व । आप्तजन ॥>>>>>>>
आपले सेवा व्रत सुरूच ठेवावे, हे बरे!
सेवेची संधी हळूहळू उमगत जातेच.
dhanyavad Gole kaka :)
उत्तर द्याहटवा