लहानपणी वीज गेली
की मेणबत्तीच्या प्रकाशात
सावल्यांचा खेळ रंगायचा
हरिण, ससा, पक्षी, मासा
वेगवेगळा आकार त्या
सावल्यांमधून तयार व्हायचा
घामाच्या धारा आणि गुणगुणणारे डास
कासवछापचा चुरचुरणारा उग्रसा वास
सगळ्या सगळ्याचा विसर पडायचा,
सावल्यांच्या त्या भासमय खेळात
जीव असा रंगून जायचा
शेवटी छोटे काय नि मोठे काय?
नको असलेला वर्तमान विसरायला
आभासी दुनियाच लागते
तात्पुरती का होईना
हेच खरे!
नको असलेला वर्तमान विसरायला
उत्तर द्याहटवाआभासी दुनियाच लागते....
:(:(
नको असलेला वर्तमान विसरायला
उत्तर द्याहटवाआभासी दुनियाच लागते
तात्पुरती का होईना
हेच खरे!
...... ह्म्म्म खरं आहे.