"ले गई दिल गुडीया जापान की
पागल मुझे कर दियाSS"
अशी गाणी कानात वाजायला लागताSSत....(इथे समजुन जा ह्या रावसाहेबांची समाधी लागलेय ) जेव्हा "ती" "लिफ्टवाली" कुडी परत एकदा माझ्या ऑफिसमधे येते.
लिफ्ट मधे माझ्या जापनीज नॉलेजची चिंधी झाल्याप्रसंगा नंतर मी जरा जपुनच असतो (होय होय तोच तो प्रसंग साल्यांनो मी विसरायच ठरवल तरी तुम्ही काही विसरु देत नाही ...आता मी माझ्या तोंडुन परत कशाला सांगायला हवय मी वेंधळेपणाने तिच्याकडे बघता बघता "कितवा मजला?" ह्या प्रश्नाचे उत्तर "२५" हा माझ्या वयाचा आकडा सांउन दिल ते?)
अॅक्च्युअली तो गोंधळ माझ्या जपानी नॉलेजचा नसुन त्या "मिचीकोच्या" सौंदर्यामुळे झाला होता हे मी आज तुम्हाला मोकळे पणाने सांगु शकतो..
नाही नाही मी अजुनही भावना दिक्षित वर तेव्हढच प्रेम करतो..पण म्हणुन काय इथे डोळे मिटुन राहु की काय २४ तास? आ! तुम्हीच सांगा? तुम्हाला नाही हक्काची बायको समोर नसेल.. तेव्हा शेजारणीकडे बघावस वाटत्...आ..आ..सांगा ना?.....मग्....तेच तर म्हणत होतो मी पण्...आणि अजुन भावनाला प्रपोज कुठे केलय्...? तिने नाही म्हंटल तर.....किंवा त्याआधीच मामा बनवल तर्...तर दुसरा काही ऑप्शन नको? का देवदास बनुन फिरायच मी?
आज तुम्हाला हे सांगायच कारण म्हणजे त्या "लिफ्ट" प्रसंगा नंतर २-३ वेळा आमची "सहजच" "अचानक" अशी भेट झाली. कधी पार्किंग लॉट मधे......कधी मॉल मधे हातमोजे घ्यायच्या निमित्ताने.....अरे हो सांगायलाच विसरलो....ती फोटोग्राफी शिकतेय आणि विकेंडसना मॉलमधे सेल्स गर्ल म्हणुन काम करते..
हाय हॅलोच काय... नाव, गाव, शिक्षण, काम इथपर्यंतची कुंडली मिळवण्याइतपत ओळख झालेय आमची. आज तिने महत्त्वाच बोलायचय असा फोन केला आणि तेव्हा पासुन मी एकदम म्हणजे एकदम सातवे आसमा पर म्हणतात तसा अगदी मनातल्या मनात "चांदी की सायकल सोनेकी सिट आओ चले डार्लिंग चल्ले डब्बल सिट.." म्हणुन बघितल तिच्याबरोबर्....बरोब्बर ओळखलत्...देशात माझ्याकडे फोर व्हिलर आहे, इथेही मी घेतलेय नुकतीच गाडी तरी का कुणास ठावुक अगदी सर्वात आधी प्रेमाची खुण म्हणुन मला सायकलच आठवते.....लहान पणी भावना आणि मी भाड्याची सायकल आणुन एक राऊंड तू चालव एक राऊंड मी अस करुन शिकलोय ना...नाही नाही भलत्या शंका आणु नका मनात्...तेव्हा डबल सीट शक्य पण नव्हत घेण......पिताश्रींनी आधी मला आणि मग सायकलला मोडल असत असे काही दिवे लावले असते तर...
तर असो....ती आली...मिचिको....आम्ही दोघे...कॉफि शॉप्......आणि....
आणि तिने सांगितल्....हाय..! स्स्स...
"साSSरे खिलौनेSS कांचके निकलेS छन से टुट गये...."
असं काय झालं म्हणता? ऐकाच...
"तिला आणि तिच्या पार्टनरला म्हणजे "तिच्या गर्लफ्रेंडला" (येतय ना लक्षात मी कोणत्या शब्दावर जोर दिलाय ते?) भारतात यायच होत फोटो एक्झिबिशन च्या कामानिमित्त पण तिच्या गर्लफ्रेंडला म्हणे दुसरी असाईममेंट असल्यामुळे....यु नो...दॅट ...ईट इज नॉट पॉसिबल फॉर हर टु जॉइन मी...." इती मिचीको..
म्हणुन मी भारतात चाललोय ह्याचा सुगावा माझ्याच बडबड करण्याच्या सवयीमुळे लागल्याने तिला माझ्याबरोबर भारतात यायच होत....हे महत्त्वाच सांगायला ही बया इथे आली होती.."
"आता आली का पंचाईत्.....तिला नेल तर भावना मला उरला सुरला भाव पण देणार नाही वर आणि आईला वेगळीच शंका येणार् जापनीज मुलीशी सुत जमवल म्हणून्....ही भावना पण सुता वरुन स्वर्ग गाठणार आणि माझ आयुष्य ह्या दोन्ही बायका मिळुन नरक करणार्........."
अर्थात घरी हे अॅडिशनल लगेज येतय हे कळवायला तर हवच ना...
"आई... हॅलो....."
"हॅलो केद्या अरे येतोयस ना ३१ ला घरी....आपल्या आर्य रत्न मधे ह्यावेळी खुप धमाल कार्यक्रम ठेवलेत्...सगळे तुझी वाट बघतायत येतोयस म्हणुन..."
"आई....हो...येतोय्...अग.....ऐक...."
"हो...अग केव्हढ्यांदा ओरडलीस्....आल्यावर सांगतो सगळ्.....अग गप्प उगाच तारे नको तोडुस्....ठेवतो फोन...."
----------------------------------
मिचिको च्या बरोबर येण्याची खबर आणि आईची नाराजी सगळ्या सोसायटीभर झाल्याने आमच्या स्वागताला भावे फॅमिली (केवळ माथेरानला गेल्यामुळे) सोडतास बाकी झाडून सगळी कुटुंब गॅलर्या अडवुन उभी होती. भावनाने नाक उडवुन "हम्म गेलास उडत" असा एक कटाक्ष फेकला....च्यायला हे तर घर बसनेके पहेलेच उजड गया टाईप झाल...
आम्ही आल्या आल्या सगळे अगदी सत्यनारायणाला जोडीने याव तसे येऊन गेले...माझी विचारपुस कमी....मिचीकोची जास्त... खरतर तिचीच चौकशी करायला आलेल सगळे....
मल्ल्या ने तर मला डायरेक्ट विचारल कोपच्यात घेऊन...."काय बे लफड काय आहे तुझं आ?"
"अरे लफड बिफड नाही रे बाबा....ही फोटो एक्झिबिशन साठी भारत कॅप्चर करायला आलेय्...आणि तिची "गर्लफ्रेंड" (मी मुद्दाम ह्या शब्दावरचा जोर वाढवत म्हंटल) सध्या परदेशात आहे"
"गर्लफ्रेंड? च्यायला येव्हढी सुंदर मुलगी आणि तिला बॉय नाही मिळाला काय कोणी?"
"मल्ल्या जाऊ दे ना च्यायला......ती गेली खड्यात, तू माझा प्रॉब्लेम समजुन घे ना बाबा. मित्र माझा आहेस का तिचा? भावनाला कस समजवायच त्याचा विचार कर.."
"ओके पण मग हे आधी नाही का सांगायच बे?"
"मल्ल्या साल्या गळयात बोर्ड घालुन फिरतो आता......तिथे एक साल भावनाने पण टाळक सटकवलय्...तू विचारलस तरी तुला सांगायला....ती तर समोर पण येत नाही.....माझ तर पार तेल गेल तुप गेल हाती राहील धुपाटण तस झालय रे बाबा"
"अरे हसतोस काय? उपाय काढ साल्या काहीतरी शोधुन्.....तुला केली होती ना मी मदत तू "बॅचलर्स" पार्टिचा घोळ घातलेलास तो निस्तरायला..."
"अबे साल्या काही पण ताणु नको....मी कधी केली बॅचलर्स पार्टी...हा बे....जरा थोडी सरबतांची पार्टी केली तर लगेच ती बॅचलर्स पार्टि होते होय रे चोरा..."
"बर बर मला काय ते सोडव ह्यातुन्....उगा तुझ दळण नको दळु..."
"ओके! आज तू घिस्यापिट्या मार्गाने का होईना भावनाला प्रपोज करायच बाकी मी सांभाळतो..."
-----------------------------------
प्रत्येक जण आपल आपल मिशन घेऊन ३१ च्या रात्री गच्ची वर जमल...
मिचीको बाईंना साडी नेसायची होती म्हणुन खास बर्वे काकु म्हणजे केदारच्या आईने ही जबाबदारी यंग पिढीवर म्हणजे भावनावर सोपवली.....आत्ता पर्यंत भटक भवानी भावना असाच उल्लेख करणार्या काकुंना तिच्यात एकदम भारतीय नारी...सोज्वळ युवती...दिसायला लागली...(हा मिचीको नावाच्या जापनीज भुकंपाचा इफेक्ट होता हे कळलच असेल तुम्हाला)
भावनाला देखील ही कोण चेटुक करणारी चिको का फिको बघायचीच होती म्हणुन तिने पण हे काम लागलीच अंगावर घेतल नी स्वतःची एकमेव आवडती साडी तिला नेसवुन द्यायच कबुल केल.....
"तू तू मै मै" ह्या एकमेव चॅनल तर्फे हा वृत्तांत खास तुमच्यासाठी
कपल साठीच्या स्पर्धा सुरु झाल्या नी प्रत्येकाची एकच धडपड सुरु झाली....
फुगे फुगवायचे आणि फोडायचे स्पर्धेत अस्मिता आणि अनिकेत पटवर्धन विजयी झाले (ह्याच कारण त्यांच्या मुलिचा नुकताच वाढदिवस झाल्याने त्यांना चांगलिच प्रॅक्टिस झाली होती)
गाजर सोलायच्या स्पर्धेत मात्र दिप्याने बाजी मारली आणि मधुची शिकवणी सार्थकी लावली
मटार सोलण्यात मात्र त्याला तेव्हढ यश आल नाही...स्पर्धेसाठी तात्पुरती तयारी केलेला आणि मुळात
"नेहमीच कामसु असा नवरा ह्यात फरक हा दिसुन येतोच" अस तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात बर्वे आजोबांनी म्हणजे केद्याच्या आजोबांनी बोलुन दाखवल. त्यांच्या वयाचा मान ठेवुन त्यांना कोणी फारस काही बोलत नाही...ह्याचा फायदा घेऊन ते बर्याचदा बरच काही ऐकवुन घेतात...
मटार सोलण्यात मात्र मल्ल्या म्हणजे श्री.मल्लेश्वर सोलापुरे विजयी झाले
तरुणाईसाठी म्हणुन अंतक्षरीचा कार्यक्रम ठेवलेला...तेव्हढाच चांन्स घेऊन भावनाने "माझिया प्रियाला प्रित कळेना आणि झुट बोले कव्वा काटे..." अशी गाणि गाऊन आपला संताप व्यक्त केला.
केद्यानेही "कहदो के तुम हो मेरी वरना....पासुन सुरुवात्करुन "हम आपके है कोन...." म्हणत भावनेला वाट करुन दिली...आणि दिलेल्या वाटेने आधी भावना मग केदार गच्चीमधुन हळुच सटकले नी चांदणे मोजायला ग्राऊंड वर आले...
इथे स्पर्धा रंगात आल्याने हि जोडगोळी पसार झाल्याचे मल्ल्या सोडताच कोणाच्याही लक्षात आले नाही....पण आधी केलेल्या मदतीला जागुन त्यानेही अळी मिळी गुप चिळी करायच ठरवल...
इरसाल खोटे नी "काड्या लावा" (म्हणजे एका मिनिटात जास्तीत जास्त काडेपेटीच्या काड्या लावायच्या) स्पर्धेत यश मिळवल.
महिलांच्या संगित खुर्ची स्पर्धेत कधी नव्हे तो मयुरी सरदेसाईंचा नंबर लागला आणि पुरुषांची स्पर्धा मात्र योगेश महेश्वरीने जिंकली
तृप्ती दोषी ने सुचवलेली चमच्याने पाणी पाजायची स्पर्धा मात्र धमाल झाली... पण विजेता/विजेती मात्र कोणीच झाल नाही
राजश्री डी ह्यांनी सुचवलेली स्पर्धा मात्र जेष्ठ कपल्स ना थोडी त्रासदायक ठरली..... दोरीची रींग स्पर्धकांनी म्युझीक संपायच्या आत डोक्यातुन घालुन पायातुन बाहेर काढुन पुढल्या स्पर्धका कडे पास करायची अस स्पर्धेच स्वरुप होत...पण जेष्ठ कपल्स पैकी बरेचसे हे "खाते पिते घरके" असल्यामुळे आणि बाकिच्यांचीही पोटं वयोमाना प्रमाणे सुटलेली असल्या मुळे रिंग डोक्यातुन गेली तरी कंबरेतुन सरकवताना कसरत करावी लागत होती.....तरिही ह्या स्पर्धेत जिंकायचा मान हा "किर्ती कात्रे" ह्या संतुर मॉमला मिळाला तो केवळ तिच्या योगा मेंटेन एक्स्ट्रा चपळ स्ट्रेंथ मुळे..
आता शेवटच्या स्पर्धेकडे सगळ्यांचे डोळे लागले होते...ती स्पर्धा म्हणजे..."श्री तशी सौ"
स्पर्धक असे होते
१. प्रदिप आणि मधु पोवळे
२. मल्लेश्वर आणि मल्लीका सोलापुरे
३. इरसाल आणि मोगरा खोटे
४. मयुर आणि मयुरी सरदेसाई
५. अभिनय आणि किर्ती कात्रे
६. चिंतन आणि शांता गोखले
७. हरिणी आणि योगेश महेश्वरी
तर एक...दोन्...तीन..म्हणताच ह्या जोड्या सज्ज झाल्या आपली नसलेली कॉम्प्यॅटिबिलिट दाखवायला.....
आवडता रंग...
पदार्थ....
सगळ्या सगळ्याची उत्तर बरोबर देत दिप्याने आखीर कार आघाडी घेतली...चला ह्या नविन वर्षाची सुरुवात तरी सुखाची होणार आणि इतके दिवस चाललेल्या ह्या ऑनालाईन परीक्षेत आपण चक्क बोर्डात चमकणार ह्या कल्पनेने दिप्याच विमान आभाळात गेल
कुणाला सांगु नकोस ह ह्या "कानगोष्टीच्या खेळात" जवळ जवळ सगळ्या जोडप्यांना हे प्रश्न माहित झालेले होते
त्यामुळे एखाद दुसरा पाठांतर कच्चा असलेला अपवाद वगळता सगळे तसे एक दोन गुणांनीच मागे पुढे होते....दिप्या आघाडीवर असला तरी सामना पुर्ण पणे त्याच्या ताब्यात नव्हता. भारता बरोबरच्या मॅच सारखच कधीही काहीही होऊ शकत होत
ह्यात पण पाठांतर करायला कमी लागाव म्हणुन इरसाल आणि मोगरा ने एकच आवडता रंग दोघांचा, एकच पदार्थ अस करुन पाठ केलेल
म्हणजे मोगराला निळा आवडतो तर इरसाल ला पण निळा
तिला मोदक आवडतात तर ह्याला पण मोदकच
म्हणजे पाठांतराचे श्रम तेव्हढे कमी.... जिथे कुठे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न होते तिथे दोघांनीही "ब" पर्याय निवडायच ठरवल होत.... म्हणजे चुकायच लफडच नको...पण त्यामुळे एक लफड झाल.....प्रश्न काहीही असो..उत्तर "ब" च द्यायच ठरल्यामुळे "नवरा फ्लर्ट आहे का?" ह्या प्रश्नाला पण बिचारीला ....अ)नाही...ब) हो...........आणि "बायको आवडते की शेजारिण?" ह्या प्रश्नावर अ)बायको...ब) शेजारिण...
पर्याय काय निवडायचा हे आधीच ठरवल्यामुळे केवळ्.....नाहीतर.....
जाऊद्या मार्क तर मिळाले त्यांना
(पण नंतरच्या वादाची नांदी झाली ती झालीच...)
ऑब्जेक्टिव्हच्या राऊंडला बरीच करमणुक झाली तरी त्यात खोटे फॅमिलीने आघाडी घेतली...
बाकीच्या जोड्या म्हणजे चिंतन आणि शांता गोखले, किर्ती आणि अभिनय कात्रे. मयुर आणि मयुरी सरदेसाई ह्या त्यामानाने वयोवृद्ध जोडपी गटात मोडत असल्यामुळे मुळातच क्रमाने चिंतन, अभिनय आणि मयुर ह्या तिघांच्या आवडी निवडी ते स्वतःच विसरुन गेल्याने त्यांची पाटी फक्त (हे देखील क्रमाने) शांता, किर्ती आणि मयुरी ह्या (आप)आपल्या धर्मपत्नीच्या आवडीने भरली होती म्हणुन वेगळ्या पाठांतराची त्यांना गरजच नव्हती.....तेव्हा दिप्याची आघाडी लवकरच धोक्यात आली हे सांगायला ज्योतिषी नकोच...
आणि आघाडी जरी कोणीही घेतली तरी विजेते ठरवताना प्रेक्षकांच्या मताचा देखील ५०% मान राखला जाईल हे डिक्लेअर झाल्याने दिप्याच स्थान चांगलच डळमळीत झालेल्...आणि निकाल लावण्यासाठी जोडप्यांच्या चेहर्यावरुन स्पॉटलाईट फिरवण्यात आला. इथे विनरच्या चेहर्यावर लाईट थांबणार होता...
आणि .....मत आणि गुण अशी बेरीज होऊन "गोखले" दांपत्याला विजयी म्हणुन घोषित करण्यात आले....त्यांच्या घरचा गोतावळाच मोठा....४ भाऊ भावांची प्रत्येकी हम दो हमारे दो अशी फॅमिली...त्यातल्या दोन भावांच्या बायका म्हणजे बी विंग मधल्या सखी पार्वती...म्हणजे भावांच्या सासरच मत पण ह्यांनाच्...तेव्हा गुण कमी असले तरी मतांच्या आघाडीने त्यांनी शेवटी क्राऊन पटकावलाच
आता पर्यंतच्या स्पर्धांमधे प्रत्येक फॅमिलीला कुठे ना कुठे एक तरी बक्षिस मिळाल तरी जास्तीत जास्त स्पर्धा जिंकणार्याला "श्री व सौ आर्यरत्न" चा मुकुट मिळणार होता.....तिथेही टॅली झाल्याने ....शेवटी...नाईलाजाने केवळ्....मतांचा आधार घ्यावा लागला....आणि...बरोबर्....निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला...
तरीदेखील शेवटी प्रमुख पाहुणे म्हणुन बसलेल्या श्री अंतू बर्वे आजोबांनी "बाळांनो, ह्या स्पर्धा महत्वाच्या नाहीत तर त्यानिमित्ताने तुम्ही एकमेकांना समजुन घ्यायचे केलेले प्रयत्न महत्वाचे आहेत बर. आता भांडा,रुसा हवे तेव्हढे पुढे जेव्हा एकटेपणा येतो तेव्हा भांडण्यासाठी का होईना सोबती हवा अस वाटत..." आणि अजुन बरच काही प्रमुख पाहुण्यांच्या "चार शब्द" ह्या नावाखाली स्वतःच्या वयाच्या मानामुळे ऐकवले. अर्थात "अनुभव" संमृद्ध करतो ह्या उक्ती प्रमाणे समस्त जेष्ठ नागरिक गटाने डोळे पुसत त्याला पावती दिली.
बाकिच्यांना देखील काही ना काही मिळालेच...जसे..
दिप्याच्या प्रयत्नांना दाद म्हणुन त्याला त्याच्या सासुबाई ऑनलाइन परीक्षेत पास म्हणुन डिक्लेअर केले.....इरसाल आणि मोगरा पर्याय निवडी वरुन वाद न घालण्याचा संकल्प केला.........आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या घरी नातसुन येण्याची चिन्हे "भावनेच्या रुपाने" सगळ्यांना गच्चीतुन खाली बघताना सोसायटीच्या गार्डन मधे दिसुन आली....
अशा रितीने प्रत्येकाच मिशन ए इयर एंड ह्या ना त्या रुपाने यशस्वी झालं
समाप्त.
गुरुवार, ३१ डिसेंबर, २००९
सोमवार, २८ डिसेंबर, २००९
मिशन ए इयर एंड - भाग २
काही काही गोष्टी असतात ना त्या आपल्या पायावर धोंडा पाडुन घेण्यासारख्या वाटतात नंतर.. तर त्यातलीच ही एक...
घरी आमची श्वसुर की श्वशुर म्हणायच? जे काही असेल ते पण ती शुरही असतात आणि असुरही त्यामुळे काहीही म्हणा सारखच. त्यातल्यात्यात श्वसुर म्हंटल की मनातल्या मनात तरी त्यांना असुर म्हंटल्याच समाधान वाटत की नाही?.. हम्म म्हणुनच मी सोयीने श्वसुरच म्हणतो..
तर आमची श्वसुर मंडळी आमच्या घरी त्यांच्या "बाबीचा" म्हणजे माझ्या बायकोचा "मधुचा" आणि माझा म्हणजे "प्रदिप पोवळेचा" संसार कसा चाललाय हे बघायला म्हणजे एकुणात माझी बोर्डाची परिक्षा घ्यायला गेले १५ दिवस येऊन राहिल्येत.
अस्मादिक सकाळी लवकरची शिफ्ट असल्याने भल्या पहाटे ६.३० लाच घर सोडतात. त्यामुळे त्यांच्या लाडिक रत्नाला म्हणजे आमच्या "सौ." ना फार त्रास होत असणार लवकर उठुन डबा वगैरे करायचा अस दुसर्या दिवशी सकाळी सकाळी मत नोंदवुन, बोर्डाच्या परीक्षेतल्या पहिल्या प्रश्नालाच भोपळा देऊन माझ्या "ऑनलाईन" परीक्षेची सुरुवात झाली.
सौ. नी पण त्यांच्या "हा मधे हा" मिळवल्याने मी "डबा नको पण मत आवरा.." अस म्हणुन तसाच ऑफिसला गेलो त्यादिवशी.
शिफ्ट ४ ला संपते आणि मी नेहमीच ४.३० ते ४.४५ पर्यंत घरी पोहोचतो. तसाच "त्याही" दिवशी मनात बाहेरच वेळ काढुन घरी जायची आलेली उबळ मारुन घरी गेलो. बाहेर भल मोठ्ठ कुलुप स्वागताला..... च्यायला ही मंडळी गेली की काय? अस म्हणुन येत नाही तरी शीळ वाजवायचा फुटकळ प्रयत्न करुन झाला...माझ्या कडच्या किल्लीने दार उघडून आत आलो.. ...तर........हाय रे दैवा.... माझ्या साठी दाराच्या बाजुलाच असलेल्या टेबल वर एक चिठ्ठी ठेवलेली...वाण्याच्या बीलाच्या मागच्या बाजुला गिचमिड ह्या शब्दालाही लाजवेल अशा हस्ताक्षरात....
"उशीर होईल.. .सकाळचा चहा उरलाय... तो गरम करुन घ्या... सॉक्स इथे तिथे न फेकता बथरुम मधे भिजवुन ठेवा....सखुबाई आज उशीरा येणारे, ती संध्याकाळी ५.३० पर्यंत येईल... तिला "बैरी पिया"चा रिपिट टेलिकास्ट लावुन देऊ नका.... वरणभाताचा कुकर लावुन ठेवा.......जमल तर २ गाजर.. साल काढुन किसुन ठेवा..बाकीच मी आल्यावर करेन..."
हवा गेलेल्या टायर सारखा ते वाचुन मी तिथेच बसलो. अरे काय आहे हे? पण न करुन चालणारच नव्हतं...मार्क द्यायला परीक्षक सॉरी एक सोडुन दोन दोन परीक्षक बसले होते येऊन्...त्यात बायको रुसली तर पंचाईत व्हायची...मग काय चिठ्ठीत लिहील्या प्रमाणे एक एक काम करत गेलो.
माझी सगळी काम संपल्यावर एक डूलकी काढणार तोच बरोब्बर कळल्यासारख दत्त म्हणुन हे तिघे हजर...
"काय बाई तरी तुमच्या पुण्यातली गर्दी...." म्हणत सासुबाईंनी सोफ्यावर अंग टाकल...
"तुम्हाला नेल असत तर निदान हातातल सामान तरी पकडल असतत्...बिचारे बाबा एकटेच होते उचलायला..नाही का ग आई?"
"आमच्या सौ नी माझी आणि तिच्या बाबांची देखील किंवा त्या निमित्ताने समस्त "नवरे" वर्गाची जागा "हमालाची" हे दाखवुन दिलं" (अर्थात हे मी माझ्या मनात नोंदवलेल मत्..आम्ही मनातच नोंदवणार्...बाहेर विचारतो कोण काळ कुत्र?)
"मी नेमुन दिलेली काम पार पाडल्यामुळे .कदाचित.. त्यादिवशी माझ्या पानात गरम गरम पोळी पडण्याचा बोनस मला मिळाला...शिवाय "बबीला" होते थोडी फार मदत.. काम थोड अव्यवस्थीत असत पण ठिक आहे.."ठकीच्या" नवर्यापेक्षा बर आहे हे..." अस एक मत पडल (सासरे बुवांना स्वतंत्र मत द्यायची परमिशन नसल्याने मी एक मत अस म्हंटलय म्हणुनच त्यांच प्रत्येक बाबतीत "एकमत" असतं अस त्या म्हणतात...) आणि "ऑनलाईन परीक्षेतला" हा प्रश्न मी पास झालो.
रात्री बायकोने तिची फेवरिट सिरियल बघायचा त्याग करुन मला जबरदस्तीने थंडीत "पोट कमी होण्यासाठी" म्हणुन शतपावली करायला जायचा आग्रह धरला.
गेल्या आठवड्यात असच तिच्या आग्रहाला बळी पडुन मी आमच्या ऑफिसच्या "तात्या"ला शेंडी लावुन हाफ डे घेऊन "चुपके चुपके" तिलाच भेटायला वैशालीत गेलो होतो...अर्धातास तिथे तिची वाट बघुन ३ कप चहा संपवुन निघायच्या बेतात असताना ती भाजी मंडईतल्या यच्चयावत भाज्या घेऊन तिथे आली. आली तेच माझ्यावर चिडत.."
"अरे खर तर माझा खडा पारशी केल्या बद्दल मी चिडायच का हिने?..." पण बायकांना म्हणजे स्पेशली (स्वतःच्या) बायकोला (स्वतःच्या) नवर्यावर चिडायचा पुर्णपणे कायदेशीर अधिकार असतो हे ठावुक असल्याने मी मुग (हिरवे मुग नव्हे) गिळुन गप्प बसलो आणि तिच ऐकत राहिलो.."
"तुम्हाला ना काही म्हणजे काही करायला नको माझ्यासाठी..."
"अग आता आलो की मी हाफ डे घेऊन तुला भेटायला इथे..अजुन काय करायला हव?"
"ते ही मीच मागे लागले म्हणुन आलात्...तुम्हाला कुठे वाटल आधी?"
"आयला आता आधी काय नी नंतर काय? आलो ना पण?"
"हो तर, भारी उपकारच ना केलेत माझ्यावर? आई म्हणाली तेच बरोबर आहे..!"
"काय म्हणाल्या तुमच्या मातोश्री?" (मला खर तर थेरडी असच म्हणायच होत पण मग स्फोट होऊन घटस्फोटाला वेळ लागणार नाही म्हणून गप्प बसलों. नाहितरी "बरे सत्य बोला यथा तथ्य चाला..." अस कुणीतरी म्हंटलच आहे ना...कुणी म्हंटलय बर...? जाउ दे ना लग्न झाल्यापासुन मला फक्त बायको...तिची आई...बाबा..मंडळींचीच नाव्..वाढदिवस्...लक्षात आहेत. शप्पत.. माझा स्वतःचा वाढदिवस पण मी विसरलो..)
"अग सांग ना काय म्हणाल्या?"
"हेच्..की तुम्ही अरसिक आहात्...कधी साधा गजरा नाही आणत माझ्यासाठी..कधी काही सरप्राईझ नाही देत की काही नाही..."
"मी गप्प..... च्यायला, आता गजरा घ्यायला जायच तर आधी ओळखता यायला हवीत ना फुल? आणि त्या बायका पण "सभ्य दिसतोय पण लफडेवाला असणार स्वतःच्या बायकोसाठी का कोणी गजरा घेतो?" अशा अर्थाने बघणार...पण आता हे हिला कस समजावणार..."
"मला काही कळत नाही ग त्यातल...आणि खर सांगु....तू गजरा..फुल...लिपस्टिक्..मेकप ह्याशिवायच छान दिसतेस ना की ह्याची काही गरजच नाही.."
"माझा बाजु सावरायचा शेवटचा प्रयत्न्...पण तो फसत नाही बरोब्बर लागु पडतो...हे तिच्या इश्शा वरुन कळत..."
तिला इंप्रेस करायच्या नादात मी "बोल काय करु तुझ्यासाठी?" अस बोलुन जातो आणि तिथेच माझ्या पायावर धोंडा पाडुन घेतो....
हा धोंडाच मला भारी पडतो अगदी आजच्या कुकर लावण्याच्या प्रसंगा पर्यंत पुरुन (म्हणजे मला पुरुन) उरतो..
तर त्यादिवशी असा धोंडा पाडुन घेऊन आम्ही वैशालीतुन बाहेर पडलो ते एक गोष्ट ठरवुनच्..म्हणजे ठरवली हिने मी फक्त हो ला हो करत होतो..
झाल होत अस की "मंद्या" म्हणजे आमच्या सोसायटीत रहाणारा मंदार भावे ३१ डिसेंबरच संकट टाळण्यासाठी माथेरानला चाललेला..आणि जाताना त्याची बायको म्हणजे आमच्या सौ. ची खास मैत्रिण माझ्या मथ्यावरच रान उडवण्याचा प्लॅन तिच्या हातात देऊन गेलेली.
माथेरानला जाण्यापुर्वी ३१ डिसेंबरला होणार्या कार्यक्रमाची रुपरेखा तिने "कोणाला सांगु नकोस ह्..तुला म्हणुन देतेय.." अस सांगुन आमच्या धर्मपत्नीकडे दिली.
(माझे आई बाबा फार आधीच गावी जाऊन राहिल्याने) त्यातल्या सास बहु वाल्या कार्यक्रमाची भीती मला नव्हती.
पण बाकीच्या स्पर्धापण काही कमी भीतीदायक नव्हत्या..तुम्हाला एक झलकच सांगतो..
१. श्री तशी सौ - म्हणजे (नसलेली) काँप्याटिबिलीटी टेस्ट
२. एक मिनिटात जास्तीत जास्त कांदे सोलणे/ मटार सोलणे (ह्यातल कांदे सोलणे नंतर रद्द झाल म्हणे कारण कांदे ३५ रुपये किलो झालेत)
३. एक मिनिटात जास्तीत जास्त गाजरांची साल काढणे/ गाजर किसणे
वरच्या ह्या स्पर्धा नवर्यांसाठी स्पेशल म्हणे...
४. एक मिनिटात नवर्याने जास्तीत जास्त फुगे फुगवणे आणि बायकोने ते फोडणे
५. बाकी संगित खुर्ची, उखाणा घेणे वगैरे वगैरेची नोंद होतीच
शिवाय बायकांसाठी खास पाककला स्पर्धा होती
आणि जास्तीत जास्त स्पर्धा जिंकणार्या जोडीला "श्री व सौ आर्यरत्न" असा किताब बहाल करण्यात येणार होता. (ह्यातल "आर्यरत्न" हे आमच्या सोसायटीच नाव आहे हे लक्षात आलच असेल तुमच्या..)
तर त्यादिवशी वैशालीत बसुन "तिने" जेव्हा मला हा स्पर्धांचा कागद हातात देऊन सांगितल की "गडेSS आपणच जिंकायची ह ही स्पर्धा.."
तेव्हाच मला कळुन चुकल..."बोल मी काय करु तुझ्यासाठी?" हा प्रश्न म्हणजे मी स्वतःच्या पायावर पाडुन घेतलेला धोंडा आहे...
आताही मला कामाला आवुन हि त्रयी वेगवेगळी पाककृतींची पुस्तक आणायला बाहेर गेलेली.
झटपट पाककृती..., १००१ पाककृती, हमखास पा.कृ. ., कोंड्याचा मांडा कृती....,तरला दलाल रेसिपीज...,संजीव कपुर्...खाना खजाना.... अशा ढिगभर पुस्तंकांची रद्दी घरात वाढली होती.
शिवाय स्पर्धा म्हणजे मग तिथे सगळेच येणार आणि मिरवायच तर नविन साडी नको? म्हणुन त्याचीही खरेदी झाली..बर ब्लाऊज वेळेवर नाही मिळाला तर अडायला नको म्हणुन रेडीमेड ड्रेस पण घेऊन झाले..
"माझ काय..?"
"मला गेल्यावर्षी हिच्या मावज बहिणीच्या लग्नात जेष्ठ जावयाचा मान म्हणुन मिळालेला शर्ट पीस होता ना तोच शिवायचा आदेश झाला"
आणि हे सगळ माहीत असुनही "ही" जेव्हा शतपावलीला जाऊयात म्हणाली तेव्हाही मी पुन्हा धोंडा पाडुन घ्यायला तय्यार झालो..
"उद्यापासुन तुम्ही लवकर उठणारात्...ह.. सकाळी सकाळी जरा स्टॉप वॉच लावुन गाजर/बटाट्याची साल काढायची प्रॅक्टिस करा...मटार पण सोलुन ठेवा....म्हणजे कस दोन दिवसात जरा हात बसेल नी तिथे हस होणार नाही.."
"इतक तिने सांगितलय मैत्रिण म्हणुन तर चीज नको का करायला? ..ते काही नाही... बक्षिस आपल्यालाच मिळायला हव..."
"आता सांगा बघु...माझ्या आवडता रंग कोणता ते?.."
"काळा.."
"चुक"
"अग पण तुच गेल्या आठवड्यात दोन काळ्या साड्या घेतल्यास ना आवडल्या म्हणुन.."
"हो पण त्या संक्रांती साठी..तुम्हाला ना खरच काSSही कळत नाही.."
"बर मग गुलाबी..." समस्त स्त्री वर्गाला लहानपणापासुन हा एकच रंग आवडतो अस आपल माझ मत
"चुक चुक चुक.." "मोरपिशी.."
"बर आता सांगा माझ्या आवडता पदार्थ्.."
"मी परत एकदा चुकलो.."
आणि हे असच आवडता पिक्चर पासुन ते आवडत अमुक्..तमुक पर्यंत चालु राहील..
शाळेत जस "...आवडता पक्षी" टाईप निबंध असतात तस मग हिने मला सगळ लिहायला लावलं
प्रश्न क्रमांक १) आवडता रंग
ऊत्तर :- मोरपीशी
प्रश्न क्रमांक २) आवडता पदार्थ
ऊत्तर :- उकडीचे मोदक, पाणी पुरी
प्रश्न क्रमांक ३)................
उत्तर :-.............................
अस सगळे प्रश्न संपेपर्यंत झाल..
पुन्हा एकदा उजळणी घेऊन झाली आणि मग आता हे दोन दिवसात पाठ करा ऑफिसात बसुन असा दम देखील देऊन झाला
"अग ऑफिस मधे काम असत" अस बोलायचा क्षीण प्रयत्न केला पण
"माहितेय माहितेय तुमच काम्....मायबोलीवर तर पडीक असता..असा टोला मिळाला"
प्रश्न अजुन संपले नव्हते. हे झाले आवडी निवडी बद्दलचे प्रश्न...
जीके राउंड मधे ....घरात महिन्याला तांदुळ किती लागतो? कोणता आणता? गहु कोणता? किती?
अशी समग्र टेस्ट होती..
त्यात पुन्हा अस्मादिक फेल्...मी आपल तांदुळ म्हणजे तोच थोडा जाड शित वाला कधी फडफडीत होतो कधी गच्च गोळा होतो तो... अस आपल अगाध ज्ञान पाजळल"
"त्यावर माहितेय माहितेय होत कमी जास्त पाणि भातात, तांदुळ नविन असला की नाही येत पटकन लक्षात त्यात येव्हढ काही बोलुन नकोय दाखवायला..."अस ऐकवुन झाल
"तिथेही मी सपशेल माघार पत्करुन टाकली..हे माघार घेण्याच तंत्र मात्र मी फार लवकर आत्मसात केलय त्यामुळे आमचे वाद फारसे होतच नाहीत.."
मग तांदुळ --- ८ किलो ...पनवेल कोलम
मधेच तुम्हाला माहितेय सहा महिन्यापुर्वी आपण वाडा कोलम खायचो.... तो आता ५६ रुपये किलो झालाय, आता २ महिन्यापासुन आपण पनवेल कोलमच आणतोय्...अजुन काही दिवसांनी रेशनचा तांदुळ आणावा लागेल... अस एक बैधिक घेऊन झालं
त्याच क्रमाने मग गहु, डाळी, भाज्या, दुध इ. सगळ्या गोष्टींची शिकवणी झाली
हि सगळी शिकवणी शतपावलीच्यावेळी झाल्याने येव्हढ सगळ बोलुन होईपर्यंत आम्ही बरेच पुढे आलो होतो. पायाचे तुकडे पडल्याने मग येताना रिक्षा करुन घरी आलो.
दुसर्या दिवशी पासुन माझी शिकवणी चारच्या गजरा बरोबर सुरु झाली. मला "वेकअप काँन्स्टंट" युज करु न देता हिने गदा गदा हलवुन उठवल.
उठल्या उठल्या आदल्या दिवशीच्या प्रश्नोत्तरांची उजळणी झाली...मग माझ्या हातात बटाटे, गाजर आणि सोलाण देऊन ही अंतर्धान पावली
त्यांच्याशी झटापट करुन झाल्या बरोबर एक किसणी घेऊन ही आली. गाजर किसायचा कोर्स पुर्ण झाला....आणि मी मटार सोलायला बसलो..
त्यादिवशी डब्यात मटार बटाटा रस्सा, गाजराची कोशिंबीर आणि संध्याकाळी मटार भात आणि गाजर हलवा इतका साग्रसंगित मेन्यु मिळाला हिच त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणायची
परत घरी आल्यावर एकदा त्याच क्रमाने उजळणी झाली नी बायकोच्या दुसर्या दिवशीच्या भाजीची तयारी करुन झाली...
ह्या सगळ्या प्रकाराने मी वैतागलेलो तर मधु आणि तिची आई अजुन अजुन उत्साहाने जिंकण्याच्या तयारिला लागलेले
हे सगळे शिकवणीचे सोपस्कार होत असतानाच एकिकडे मी चिरुन ठेवलेल्या भाज्यांमधुन रेसिपी पुस्तक पालथी घालुन एक मिश्र स्वरुपाची रेसिपी करायच्या मागे मधु लागलेली. त्यामुळे संध्याकाळी नेहमीच्या जेवणा बरोबर काय सरप्राईझ (?) असेल ह्या कल्पनेनेच माझी भुक मरायची.. पण दरवेळी व्वा! व्वा!...व्वा! फायस्टारच्या शेफच्या तोंडात मारेल असा झालाय हा पदार्थ अस म्हणुन मी माझी कातडी बचावायचो...नी रात्री न चुकता इनो घेऊन झोपायचो..
इथे एक गंम्मत बघा मित्रांनो...चॅनल वरच्या रिअॅलिटी शो प्रमाणेच हे शो होणार होते म्हणे आमच्या सोसायटीत. आम्ही स्पर्धक.. पण मला आतल्या गोटातुन प्रश्नपत्रिका मिळाली. त्यावर बायकोने उत्तर घोकुन घेऊन "वरचे सा" मिळालेच पाहिजेत अशी तय्यारी करुन घेतली. आता राहिला फक्त तिथे ही घोकमपट्टी मांडायचा संबंध्...की झालोच आम्ही "श्री व सौ आर्यरत्न"
आहे की नाही धम्माल....
असो काही हरकत नाही त्या निमित्ताने मला कळल तरी माझ्या बायकोला "मोरपिशी" रंग आवडतो, आम्ही "कोलम तांदुळ खातो.." तर आता मी अगदी एक्सपर्ट झालोय १ मिनिटात मटार सोलण्यात्/गाजराची साल काढण्यात/गाजर किसण्यात
आता फक्त ३१ ची वाट बघायची तेव्हढ बाकी आहे..... हा दिप्या हा किताब जिंकुन दाखवतोच की नाही बघा....
(डिस्क्लेमरः इथे कुणाला नामसाधर्म्य आढळल्यास तो योगायोग नसुन ती त्या व्यक्तीची स्पेशल रिक्वेस्ट होती ह्याची नोंद घ्यावी)
(सुचना: "आर्यरत्न मधे दोन विंग मधे मिळुन २४ कुटुंब रहातात. पैकी भाग एक मधे मंदार भावे उर्फ मंद्याचे कुटुंब भेटिस आले तर भाग दोन मधे प्रदिप पोवळे उर्फ दिप्या आपल्या भेटिस आला. अजुन कोणा कुटुंबास आपले मनोगत व्यक्त करायचे असल्यास कृपया इमेलने संपर्क साधावा ही विनंती. ह्या पहिल्या दोन कुटुंबांस त्यांचे मनोगत मांडण्यास भुतदये खातर काहीही फी लावली नाही तरी अशी दया दाखवणे दरवेळेस शक्य होणार नाही ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी)

शुक्रवार, २५ डिसेंबर, २००९
चक्र/वर्तुळ भाग ३
"Passengers your attention please....."
"यात्रीओसे निवेदन है..."
"प्रवाशांनी कृपया इथे ..."
अस तीन भाषांतुन ओरडत निवेदिका, गाड्या आज पण लेट असल्याच अनाउंस करत होती....."
"आत्त्ताच ह्या स्मी चा फोन बंद पडयला हवाय...?"
"नशीब लागला एकदाचा..हॅलो..."
"स्मि, कुठे आहेस? गाड्या लेट आहेत... ऐकु येत नाहीये मोठ्याने बोल्...काय माहीत फास्ट ट्रॅकला काहीतरी लोचा झालाय यार. तू ये लवकर. लेदिज स्पेशल ने जाऊयात. नको.. नको डोंबिवली नको ती कोपर पासुन भरुन येईल आज. लवकर ये घोडे..मी ब्रीज वर उभी आहे ३-४ च्या मधे"
"डोळे कसली बंद करत्येस स्मि... फालतु गिरी नको... चल गर्दी बघ खाली, उतर भर भर लेडीज अनाऊंस केलेय..."
"हुश्श! स्मि इथे एक मुलुंड आहे, घाटकोपर शिफ्टिंग आहे दादरला विंडो.... इथेच ये.. आज माझे पाय खुSSप दुखतायत" "नशीब मुलुंड सिट मिळाली ते"
"कशाने काय दुखतायत? वेंधळी कुठली सॅट-संडे ला ट्रेक ला गेलेलो ना येडचाप. ट्रेक गृपचा सहावा बर्थ्डे होता. काय धम्माल केली म्हणुन सांगु...आय्य आय्य .. जरा देखके जाओ ना आगे,धक्का देके चलते है.. हम भी रोज ट्रॅव्हल करते है.. हा हा तुममे तमीज है ना तो रखो तुम्हारे पास.. हमे मत सिखाओ कैसे खडा रहनेका ते..."
"अरे काय सोड ना स्मि? कशी बोलतेय ती बया? फालतुगिरी नुसती..!"
"आज च्यायला घरी आईची पण किटकिट चालु होती... फालतुगिरी नुसती..."
"काही विचारु नकोस काय झाल घरी म्हणुन...? नेहमीचच्...मी ट्रेक ला गेले ना.."
"मने...पुढच्या आठवड्यात जोश्यांकडची बघायला येतायत.. आता थोडे दिवस तरी ट्रेक बीक पुरे...हात पाय मोडुन बसाल नाहीतर चेहरा काळवंडून घ्याल उगाचच..." इति मातोश्री
"च्यायला या आईच पण फालतुच टेंशन असत हा...पुढच्या आठवड्यात येणारेत तर येऊदेत की..आता त्यासाठी मी काय मखरात गौर होऊन बसायच आत्तापासुन..."
"हसतेस काय? आ... तुझ बर आहे च्यायला कॉलेजमधेच झाल तुमच ढँन टॅन्..आम्ही ना घर के ना घाट के.. ना लव मॅरेज जमत ना अॅरेंज वाले कांदे पोहे पटत.. सगळा लफडाच साला फालतुगिरी नुसती.."
"आई ग! आज जाम म्हणजे सॉल्लेड दुखतय अंग.. सगळ रॅपलिंग येतय बाहेर. हे हात बघ ..ग्लोव्हज विसरले न्यायला.. हे बघ कसे झालेत ते..."
"हम्म.. पण धम्माल केली एकदम फालतु च्यायला तुला सांगते.. एक नविन बकरा आलेला ह्यावेळी गृप मधे "धनेश" गुज्जु. आयला काय खेचलाय ना बास रे बास नुसत "धनेस्स धनेस्स स्नेक करलो" म्हणुन हात धुवुन मागे लागलो त्याच्या"
"रॅपलिंग करताना काय तंतरलेय त्याची...अर्ध्यावर तसाच बसुन राहीला..म्हणे मी नाही येणार खाली तसाच वर चढु काय?.. आणि आमचा गृप माहीतेय ना तुला कसला अवलिया आहे म्हणे चढ तू वर आम्ही जातो खाली जेवायला..ये एकटाच मग.."
"त्याला येवह्ढ सांगतोय येड्या पाय परपेंडिक्युलर ठेवायचे चिकटवुन, हातातल्या दोर्याला ढील द्यायची हळु हळू .. आणि मॅड कॅप पडेल कसा तो इतक नीट बांधलेल असत की दोन्ही हात सोडुन लटकलो तरी खाली नाही पडणार.."
"स्मि पण च्यायला माझी पण तंतरलेली एक क्षण असला वारा सुटलेला ना मला धीरच होत नव्हता थोडावेळ ढील द्यायचा.. आणि वरन हे पंटर लोक म्हणे आता नाही उतरलिस तर दोरच कापु वरुन म्हणुन पिडत होते"
"पण धम्माल आली यार कधी नव्हे ते ताईंच्या घरी आम्ही जमतो ना तिथे कोबी नी फरसबीची भाजी खाल्ली वेड्यासारखी.. घरी कधी बघत पण नाही मी ह्या भाज्या"
"आज माहितेय मी गजर लावुन लवकर उठले, ट्रॅकची बॅग रिकामी केली कपडे मशीनला लावले, सॉक्स धुतले... आई हळुच बघत होती..तिला समजतो असा मस्का लावलेला.. पण काय यार ट्रेक ला गेले तर काय चिडायच त्यात.."
"पुढच्या आठवड्यात दिपु माहितेय ना आमच्या गृपची तिचा साखरपुडा आहे पराग बरोबर तोही आमच्याच गृपचा. त्यामुळे आई अजुन चिडलेय्..म्हणे करा लोकांचेच साखरपुडे अटेंड करा..स्वतःच्या लग्नाच बघु नका नी आईच्या मनासारख वागु नका.."
"इरिटेटिंग रे.. काय सारख फिरुन फिरुन माझ्या लग्नावर यायचं"
"ए थांब बीप वाजतेय समस बघते कोणाचा आहे ते.."
"हे बघ सुन्याचा समस तुझी स्कुटी घेऊन जातोय वर शिव्या घातल्यान म्हणे पेट्रोल भराव लागेल आधी.."
"अग अशी बघतेस काय? जवळपास आमच्या सगळ्यांच्या स्कुटी/बाईक्स आहेत. प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या गाडीची चावी पण आहे. ज्याची फ्री असेल गाडी त्याची गाडी घेऊन निघायच्...मातोश्रींना नाही माहीत हे उद्योग्..सालंच काढतील माझी...ती मारत नाही ग पण बोलत नाही आणि मला तेच आवडत नाही...भांड्..रागव नी मोकळी हो ना हे काय बोलायच नाही म्हणजे.."
"आमच्या अड्ड्यावर भेटतो ना संध्याकाळचे किंवा शनिवारचे ते सुद्धा आवडत नाही तिला. चांगली देवळाच्या बाहेरची जागा आहे. तरी म्हणे कोणी बघितल तर विपर्यास करायच ...लग्न ठरायचय तुझ..तिच तिच रेकॉर्ड लावते"
"आय नो यार तिला काळजी वाटते माझी..आय लव हर टु.. तिच्यासाठी एक सरप्राईझ ठेवुन आलेय.."
"चल बाय माटुंगा गेल, तू नीघ संध्याकाळी भेट मी ६.०३ कल्याणला असेन..."
------------------------------------------------
"शेखर...अरे ऐकतोयस ना..पेपर ठेव बघु बाजुला.."
"हम्म बोला... अस मोघम नको बोलुस्..लक्ष दे मी काय म्हणतेय त्याकडे.."
"मला खुप काळजी वाटते रे मनुची..."
"का काय का? लहान नाही समजतय म्हणुन तर काळजी वाटते.."
"२८ म्हणजे आता ह्या वर्षी तरी जमायलाच हव ना तिच लग्न्..परवा दिप्तीचा साखरपुडा आहे"\
"हिच्यापेक्षा लहान मुलींची लग्न ठरतात होतात नी त्यांचे आईवडील नातवंड पण खेळवतात.."
"होईल होईल काय? कोण घोड्यावरुन येणारे का न्यायला राजकुमार? प्रयत्न नकोत करायला?"
"आपण बघतोय काय? त्याने काय होणार नुसत?"
"कुठे जमवलयस का?... नाही... "
"कांदेपोहे....प्रोग्रॅम आवडत नाही"
"मेळ्याव्यात काय जायच म्हणे भाजी खरेदीला गेल्यासारख.."
"मला पटतय रे..मलाही नव्हत आवडत कांदे पोहे वगैरे पण आपल्यावेळीही होता का ऑप्शन.."
"भाषा बघ एकदा तिची..कुलकर्ण्यांच्या घरी फिट बसते का? आ...सांग ना"
"माझा फक्त तिच्या ट्रेकला कट्ट्याला विरोध दिसतो त्यामागची काळजी नाही दिसत कोणाला..."
"आता आली घरी की तुच सांग तिला समजावुन..." "कितीही मी मला तिच्या जागी ठेवल तरी नाही जमत आता मला हे...."
चल तिचा खण आवरते जरा.... नुसता पसारा करुन गेलेय सकाळी..चार कपडे काय धुवायला टाकले मशिन मधे झाली हिची काम..."
"प्रिय मॉम्स,
मला माहित होत तू माझा खण आवरायला घेणार ते.. ममा मला तुझी काळजी कळते ग्...ठिक आहे मलाही लग्न करायचय पण म्हणुन ते जमत नाही तोपर्यंत सुतक असल्यासारखच का वागायचं. जमेल की जमायच तेव्हा..तू म्हणतेस तेही बरोबर आहे माझ मी जमवल नाहीये आणि दाखवायची पद्धत आवडत नाहीये. तरी सध्या काही पर्याय देखील दिसत नाहिये दुसरा..सो चील मॉम्स्...तू म्हणशील तशी मी वागेन बस्स्..खुष्..पण प्लीज माझ्याशी अबोला नको धरुस्....यु मीन अ लॉट टु मी...लव्ह यु ममा..
मनु"
"शेखर...शेखर्...हाका मारता मारता ..खणाच्या वर ठेवलेल पत्र हातात धरुन मी नुसतीच भीजवत राहीले स्वतःला.. "
नविन पिढी..अवतार वेगळा भासला तरी अंतरंग तसाच आहे म्हणायचा..माझाही चष्मा बदलायला हवा आता...गेल्यवेळी आईची मदत लागली हे चक्र/वर्तुळ समजावुन घ्यायला.. आता ही मुलगीच आई झाली माझी... ह्याला उत्तर लिहायलाच हव. ऑफिसमधे तिचा फोन सायलेंट वर असतो म्हणजे कॉल करुन उपयोग नाही....
लॉग्ड इन करुन मी इमेल टाईप करायला सुरुवात केली....
प्रिय बिट्टू,
तुला आठवतं तू १३-१४ वर्षाची असताना आपण असेच "अबोला"धरायचो. तुला बिट्टो म्हंटलेल नाही आवडायच्...बाळा तेव्हा तुझी आजी म्हणजे माझी आई आली होती माझ्या मदतीला धावुन..
मधे काही काळ गेला अॅडजस्ट होण्यात ...मग माझा हात फ्रॅक्चर झाला...त्यानंतरच तुझ गॅदरिंग मधे केलेल भाषण्..अजुन आठवतय मला सगळ..
पण तू ग्रॅज्युएशन पुर्ण केलस, पोस्ट ग्रॅज्युएशन केलस्...मग नोकरी....त्यातच तुझे ट्रेक्स्...तुझा कट्टा...
आणि एकेक करुन तुझ्या गृप मधल्या मुलिंची लग्न ठरण्..त्यांच आई होण्...आणि तुझ वरवरन बेफिकीरी दाखवण्..हे सगळच बाळा कुठेतरी आत मला दुखवुन जायच्...जात...त्यातुनच मग तुझ्यावर चिडण होतं
वाटत्...इतकी हुषार माझी लेक्..इतकी गोड ...मग तिचच का सगळ्यांसारख सगळ मार्गी लागत नाही
अर्थात लग्न होण म्हणजे आयुष्य मार्गी लागण नव्हे हे खर असल तरी "आईच्या" मनाला चारचौघींप्रमाणे आपल्याही लेकीच व्हाव अस मनातुन वाटतच असत ग..
असो काल मी तुझ्यावर रागावले...तू माझ्याकरता म्हणुन २ घास खाऊन झोपलीस्...आज पण थोडी गुश्श्यात गेलीस्...वाटल पुन्हा एकदा माझ्या आईने याव नी मला पुन्हा एकदा कुशीत घेऊन हे सार संपवाव पुन्हा सार हसतं खेळतं व्हाव...
अर्थात आज आई नाही येऊ शकत्...पण ते गाण तू म्हणायचीस ना लहानपणी रेडिओवर लागल की...
"आई व्हावी मुलगी माझी ...मी आईची व्हावे आई..."
"खरच बाळा आज तुच माझी आई झालीस..."
"लव्ह यु बेटा....लव्ह यु ऑलव्हेज इन एनी सर्कम्स्टंसेस ऑफ लाईफ.."
टेक केअर..
तुझी
ममा म्हणुन की तुझी लेक म्हणु?
---------
इमेल सेंट केल आणि मी तशीच बसुन राहीले...

गुरुवार, २४ डिसेंबर, २००९
मिशन - ए - इयर एंड (भाग १)
"डाSSडा डा, ड डाSSडा डा, डा डा डा डा डा....सँटाक्लॉज इज कमिंग.. ललाल... रायडिंग ऑन द स्ले....
डाSSडा डा, ड डाSSडा डा, डा डा डा ड डा..."
"ए पक्या सकाळी सकाळी डोक नको खाऊस तुझ्या डडानी.....आधीच कँटिन वाला २ वेळा फोन करुन पण चहा घेऊन आला नाहीये."
"चल बे मंद्या, चील याSSर. उद्या पासुन तीन दिवस सुट्टी.... चेहरा काय असा करतोयस तेराव्याला गेल्या सारखा?"
"तू हस बे, तुझं काय जातय" "एकतर मी सुट्टीला जोडुन एक दोन सुट्ट्या टाकुन बाहेर जायच्या प्लॅनला कात्री लावली म्हणुन बायको वैतागलेय.त्यावर मात म्हणुन ह्यावेळी आई सोसायटीच्या सांस्कृती़क कमिटिवर गेलेय नी त्यांच्या सुनबाईंनी कधी नव्हे तो शत्रुपक्षाशी हात मिळवणी करुन माझा मोरु करायचा चंग बांधलाय"
"मंद्याSS मंद्या शांत हो, हे पाणि पी आणि सविस्तर सांग बघु काय झाल ते?"
"अरे काय सांगणार कप्पाळ?"
"मग मी जाऊ?"
"पक्या, थांब ना प्लीज. महाभारतातल वस्त्रहरण व्हायची वेळ आलेय माझ्यावर.."
"मंद्या मंद्या पुरे मी मरेन आता हसुन हसुन.:D वस्त्रहरण.. ते ही तुझं?..."
"बर बर नाही हसत. चल बक ना बे आता काय ते"
"मी इयरएंड ला बाहेर जायचा प्रोग्रॅम कॅन्सल केला.. तेव्हाच आमच्या सोसायटीत ह्यावेळी सांस्कृतीक कार्यक्रमाच्या नावाने खिसा मोकळा करायचा ठराव पास झाला. आणि आमच्या होम मिनिस्टरने तो "सासुच्या राशीला सुन का सुनेच्या राशीला सासु" अशा कुठल्या तरी घरचे वाद चव्हाट्यावर आणणार्या सिरियल प्रमाणे तसाच शो करायची सुचना समस्त महिला वर्गाच्या गळ्यात उतरवली"
"अरे मग तुझ कस वस्त्र हरण होणार? ह्यात तू कुठे आलास मधे मंद्या? साला काही पण बोलत असतो नी सकाळी सकाळी फुकाचा चेहरा पाडुन बसतो"
"अरे नाही कसा संबंध?" "चार भिंतीत रस्सी खेच चालते तेव्हा मीच असतो की मधे समुद्र मंथनातल्या "वासुकी" सारखा. फक्त दोन्ही बाजुचे गट देव असुर असे नसुन त्या ही पेक्षा भयानक जमात असतात"
एक मला""ममाज बॉय" म्हणुन थपडावते, दुसरी "बायकोच्या ताटाखालच मांजर" म्हणते
"अरे पण तू बोका आहेस ना? मग मांजर कस म्हणतात काकु तुला?"
"पक्या... पाचकळ पणा पुरे. माझा जीव जातोय नी तुला फुटकळ विनोद सुचतोय?"
"बर बर सॉरी, चालुदे मांजर बॉय.. पुढे.."
"पक्या साल्या तू पुण्यवान आहेस रे, मारुतीचा उपासक परत रहायला एकटा.वाट्टेल तेव्हा एचबीओ बघु शकतोस साल्या.." "कधी मराठी सिरियल्स बघितल्यास का? त्याही दमुन भागुन घरी आल्यावर रात्री जेवताना? स्पेशली ती "सासु सुन राशी वाली सिरियल?"
"बघितलीच नसणार तू कधी. तुला थोडीच साडेसाती लागलेय.."
"अरे काय हिम्मत असते रे त्यात भाग घेणार्या बायकांची.. गेल्या वेळचा एपिसोड बघत होतो म्हणजे बघावा लागलेला म्हणुन बघत होतो. एक सुन चक्क येव्हढे बघे प्रेक्षक असणारेत हे कळुन सुद्धा म्हणाली "माझ्या सासुबाई आळशी आहेत" तिची सासु पण काही कमी नव्हती ती म्हणे "सुन उद्धट आहे"
"हे!हे! अरे म्हणजे हे तर तुमच्याच घरच ट्रेड वाक्य झालं.."
"अरे हो पण पक्या हे त्या बायका टिव्हीच्या कार्यक्रमात जाहिर रित्या बोलतात" "त्या सिरियल मधे आलेले त्यांचे त्यांचे नवरे नक्कीच सॉर्बिट्रेट जीभेखाली ठेवुनच बसत असणार कार्यक्रम भर. त्याच्या नंतर देखील महिनाभर भुकंप होत असणार नक्की त्यावरुन घरी."
"तिथे मेकप जाईल; उगाच का खराब दिसा म्हणुन हसुन ऐकुन घेत असतील सगळ्या साळकया माळकया पण नक्कीच नंतर "फियान" येत असणार"
"तर मुद्दा ती सिरियल नसुन आता तोच खेळ (खंडोबा) आमच्या सोसायटिच्या ३१ डिसेंबरच्या रात्री होणार आहे. ज्याचे पडसात २०१० मधे नक्कीच भुकंपाने होतील म्हणुन मला आत्ता पासुनच घाम फुटलाय"
"ओ बोकोबा, जरा बसा हा घ्या कँटिन वाल्याने आणलेला फुळकवणी चहा. नी विचार करुद्या जरा"
"एक तर हे सगळ टाळायच म्हणुन मी रामदास स्वामींचा भक्त झालो तर च्यायला आता दुसर्याची धुणी धुवायची वेळ आली."
"पक्या अस रे काय करतोस, मित्र म्हणवतोस ना"
"बर ए मांजर्या गप आता रडु नकोस. सरळ सांग ना दोघींना भाग घेऊ नका नाहीतर फक्त चांगल बोला एकमेकिंबदाल म्हणुन"
"व्वा! हे एव्हढ सोप्प आहे अस वाटतय तुला? अरे ब्रह्मचार्या एकमेकींना अडचणित आणायची संधी शत्रु कधी सोडतात काय? तुला काय कळणार म्हणा ते, पण आता डोक लाव नी सांग हे तिसर महायुद्ध कस टाळु?"
अरे काल आई मला प्रश्न दाखवत होती तिने काढलेले
१.सुनेचे न आवडणारे गुण (?) आणि ह्याच्या उत्तरात आळशी आहे, उद्धट आहे, मुलाला तोडला माझ्यापासुन असे एक एक बाँब आहेत
२.घरी काम कोण करत? कोणाच जेवण अधीक आवडत
३.सुन आल्यापासुन मुलामधे झालेला बदल
४.मुलगा कामात सुनेला मदत करतो तस आईला करायचा का आधीपासुन....
बायकोने पण अशीच प्रश्नावली तयार ठेवलेय
तिच्या उत्तरांमधेतर
सासुबाई दुटप्पी वागतात, सर्वांवर कंट्रोल ठेवायला बघतात. माझ्या माहेरच्या माणसांना पाण्यात बघतात पासुन ते मला ह्या घरात नुसती मोलकरीण म्हणुन आणलय इथपर्यंत सगळी क्षेपणास्त्र आहेत
हे मोलकरीण, पायपुसण वगैरे शब्द तर दोघींनी कॉपी पेस्ट केल्यासारखे वाटतात
"आता सांग पक्या, हे चार भिंतीत चालणार युद्ध जरी पीत पत्रकारिते मुळे सोसायटी भर होत होतं तरी ते दोन देशांपुरत म्हणजे आपापसात होतं आता ह्या कार्यक्रमामुळे ते जागतिक महायुद्ध होऊन इतरांचीच करमणुक नाही का होणार? बर ह्या मुळे वाद थांबणारेत का? तर उलट वाढतील पण हे समजुन उमजतील तर त्या बायका कसल्या. बर झाल तू लग्न नाही केलस.."
"अरे मग सोप्पय तू तिला घेऊन कुठेतरी बाहेरच का नाही जात त्या दिवशी? न रहेगा डॅश डॅश न तुटेगी बासरी अशी काय ती म्हण आहे ना.."
"अरे मी सुचवुन बघितलं, तिच म्हणणं मी आधी तिचा प्रोग्रॅम कॅन्सल केला म्हणुन आता तिला असा एक दिवसाचा प्रोग्रॅम नकोय."
"मग बिंधास्त सुट्टी टाक सोमवार पासुन ४ दिवस नी नविन वर्षाला ये ऑफिसला, सांग तिला सरप्राईझ होतं म्हणुन. या बायका ना पटकन फसतात अशा सरप्राईझेस ना..आणि कुठचच बुकिंग नाही मिळालं तर माझ्या माथेरानच्या घरी जाऊन रहा. आई बाबा गेल्यापासुन ते बंदच असत, शेजारच्या रामुकाकांना सांगुन साफ करुन घेऊ आधीच"
"च्यायला पक्या काय डोक आहे रे तुझं.. मान गये. ब्रह्मचार्या तुला रे बरी माहीती कशा फसतात सरप्राईझेस ला ते" "माथेरान तर माथेरान याSSर माहाभारत तर टळेल"
----------------------------------
ट्रिंग ट्रिंग...
"हाय अस्मि....मी स्वाती बोलतेय ..मिशन सक्सेसफुल.!.....येस्स मदाम.. तुझी पार्टी डन..हो..हो..अगदी तू म्हणालेलीस तसच झाल.."
"तू म्हणालीस तसच झालं त्या "सास बहु" खेळाच्या नावानेच मंदारच बीपी वाढल"
"तू म्हणालीस तसच अगदी मी वर्णन करुन करुन त्याला माझ्या प्रश्नोत्तरांची माहीती दिली"
"हो.. अग साहेब आज घरी आला तोच माथेरान माथेरान करत आला.. आधी सांगत होते तर ऐकतच नव्हता म्हणे सुट्टी नाही मिळणार.. इथेच मागवुयात जेवायच बाहेरुन....सोसायटीचा कार्यक्रम बघुयात...वगैरे वगैरे"
"आता म्हणतो आपण २-४ दिवस बाहेर जाऊयात" "माथेरान... तस ठिकाण काही माझ्या लिस्ट वर नव्हत पण ठिक आहे तसही आम्ही कुठे गेलोच नाही आहोत ३-४ वर्षात सुट्टी नाही म्हणुन"
माथेरान तर माथेरान. "अस्मि देवी आपण महान आहात. आपकी दवा काम कर गयी.."
"तथास्तु बालिके..."
(डिस्क्लेमरः पात्र नी प्रसंग पुर्णपणे काल्पनिक असले तरी तसे साम्य आढळल्यास तो योगायोग नसुन ह्यालाच जीवन ऐसे नाव असे समजुन अळी मिळी गुप चिळी करावी. आणि घरोघरी मातीच्या चुली/बर्शन चे गॅस, खाई त्याला खवखवे, चो.च्या.म्.चा. अजुन किती साम्य वाटतील अशा म्हणी आठवल्यास मनातल्या मनात म्हणुन ४ थीच्या स्कॉलरशीप परिक्षेची (दिली असल्यास) उजळणी करावी)
स्टॅट्युटरी नोटिसः इथुन प्रेरणा घेऊन त्या सल्ल्याबरहुकुम कोणाला प्रयोग करुन बघायची उर्मी झाल्यास असे सल्ले उपाय हे स्वतःच्या अक्कल हुषारीवर अॅलर्जी टेस्ट घेऊन मग वापरावेत

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)