बरा असतो नाही कधी कधी
मुखवटा, सोयीचा नी सवयीचा
अगदी आरशाच्याही ओळखीचा
नाहितरी तो काढल्यावर
चेहरा ही दचकुन मागे बघतो
स्वतःची ओळख शोधायला
तेव्हा मुखवटाच मागे हसत असतो
कारण चेहर्याची ओळख जाणणारा
जगात तोच एकटा असतो
आरसाही फसु शकतो तर माणसाच काय?
-------------------------------------
मुखवटा आहे म्हणुन तर;
चेहर्याला मनसोक्त रडता येते
जग काय म्हणेलची पर्वा न करता;
मुखवट्या आड का होईना, व्यक्त होता येते
मुखवटा आहे म्हणुन तर;
तो आरश्यालाही फसवु शकतो
भाव असतात लपवायचे
म्हणुन तर मुखवटा असतो
त्याच्या एकलेपणाला
मुखवटाच तर साथी असतो
कधी तो, तर कधी; मुखवटा
त्याला समजावतो
दुखवटा साजरा करायलाही
त्याला मुखवटाच जवळचा वाटतो
(माझ्या दोन मित्रांच्या कविता वाचुन सुचलेल्या काही ओळी)
“मुखवटाच मागे हसत असतो
उत्तर द्याहटवाकारण चेहर्याची ओळख जाणणारा
जगात तोच एकटा असतो” .... क्या बात है