असं वाटतं, झोकुन देऊन
जीव लावणं सोडुन द्याव
प्रेमात देखील जमाखर्च
मांडायला शिकुन घ्याव
विषापेक्षा जहरी शब्द
वापरायला शिकुन घ्याव
आपण हरतोय वाटल की
शब्दांनाच हत्यार कराव
नात विरल पर्वा नाही
डाव आपण जिंकुन जाव
प्रेमात देखील जमाखर्च
मांडायला शिकुन घ्याव
अस वाटत.. वाटत खर
पण..मग वाटत, जाउदे
डावपेच की नातं, दान
ज्याच त्यानं निवडायच
तू खुशाल मांड हिशोब..प्रेमाचा
मांड जमाखर्च त्यातील नात्याचा
मी ठरवलय,माझ्यापुरत
माझ्यासाठी, हे नातं निभवायच
व्वा .... मनातल्या विचारांची आंदोलनं छान व्यक्त झाल्येत.
उत्तर द्याहटवा