झुगारुन दे बंधने तू मनाची
उगा बाळगा का, भिती ही कुणाची?
असे' ही खुपावे, 'तसे' ही खुपावे
अशी रीत आहे, इथे ह्या जगाची
उद्या काय व्हावे, न कोणास ठावे
नको व्यर्थ चिंता, करु तू कशाची
सुखाच्या क्षणांना, उराशी धरावे
नको खंत आता, व्यथेच्या क्षणाची
जसा काळ येतो, तसे त्या भिडावे
किती आळवावी, कहाणी फुकाची
शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०
कोलाज / स्लाईड शो
घरातली कामं आटपून पटपट तयार होऊन ती आईकडे गेली आणि नेहमी प्रमाणेच पुन्हा बाबांनी तिचं डोकं सटकवलं. ते बाहेर पडले आणि आईने हताशपणे तिच्याकडे बघीतलं.
"जाऊदे ग! आजारपणात माणूस जास्तच चिडचिडा होतो" तिने आईची समजूत घातली.. पुन्हा एकदा.
"आजचं आहे का हे?" आईच्या ह्या प्रश्नावर मात्र तिच्याकडे ऊत्तर नव्हतं. ती तशीच वायफळ बडबड करुन १५-२० मिनिटात तिथून निघाली आणि तिच्या तिच्या घरट्यात पडदा ओढून बसली.
तरी पुन्हा दुसर्या दिवशीची सुरुवात "बाबा कसे आहात?" ह्या "सुप्रभात कॉलनेच" झाली, पुढे तसेच नेहमीचेच संवाद आणि "मी करेन पुन्हा फोन" ह्या नेहमीच्याच वाक्याने शेवट.
पुन्हा विकांताला एक चक्कर त्यांना भेटायला जी त्यांच्या आजारपणाचं कळल्यापासून शक्यतो न चुकता व्हायची ... नी पुन्हा एकदा तसच गुदमरणं...
गेल्या दोन तीन महिन्यापासून जणू हे तिचं रुटीनच होऊन गेलेलं.
"तरीही का करते ती फोन? त्यांना बरं वाटावं म्हणून? तिला बरं वाटावं म्हणून? की एक मुलगी म्हणून असलेलं कर्तव्य म्हणून?" तिच्या मनात आलं.
"अफकोर्स त्यांना बरं वाटतं आणि कुठेतरी तुलाही बरं वाटतं" मनातून आतून एक आवाज तिला म्हणाला.
"हम्म! पण मग प्रत्यक्ष भेटल्यावर तो ओलावा का पटकन आटतो? का नेहमीच असं वाटतं की इथून पटकन निघून जावं? ही दुनिया पाठी टाकून पुन्हा मोकळ्या हवेत जाऊन छाती भरून ऑक्सीजन घ्यावा?"
"नक्की कोणती भावना खरी? एकाच वेळी एकाच व्यक्ती विषयी प्रेम, माया अगदी मदरली प्रेम म्हणतात तसं प्रेम आणि त्याच वेळी तितकीच तीव्र कटुता, वाटू शकते?" मनात पुन्हा एकदा ह्या प्रश्नाने गर्दी केली.
तिला ठावूक आहे ह्या सगळ्याची मुळं फार खोल बालपणात दडल्येत. कारण तिला अजूनही आठवतात सगळ्या सगळ्यांच्या.. नातेवाईकांच्या, मित्र मैत्रिणींच्या, शाळेतल्या शिक्षिकांच्या, शेजारी पाजारी अगदी इस्त्रीवाल्यापासून वाण्यापर्यंत सगळ्यांच्याच तिच्या विषयी, तिच्या भावाविषयी डोळ्यात कणव दाटलेल्या नजरा.
अजूनही आठवतं तिला बाहेरचं जग आणि घरातलं जग ह्यातलं तिचं समांतर वावरणं आणि आठवतय तिला अजूनही "हे घर माझं आहे, इथे माझेच नियम चालतील" म्हणत चालणारं "त्यांचं" हुकूमशाही वागणं.
"त्यांच" लोकांच्या देखत स्वतःच्याच थोबाडात मारुन घेणंही आठवतय स्पष्ट अजुनही आणि मग बुरखा घालायची मुभा असती तर बर... कोणी तिला बघायला नको नी कोणाला तिने असं तिला वाटायचं त्याप्रयेक वेळी हे देखील आठवतय अजूनही तितकच स्पष्ट.
ऐन दहावीच्या परिक्षेला सिंगल रुम मधे रहाताना टेबल लँपचा प्रकाशही त्यांना सहन होत नाही म्हणून.. आणि हे घर त्यांचं आहे ह्या एका वाक्यामुळे भावाला शेजार्यांच्या दाराबाहेरच्या दिव्याखाली करावा लागलेला अभ्यासही आठवतोय आणि त्याच्या तिथे तसं बसण्यामुळे आईचही त्याच्या बाजूला बराच वेळ बसून मूक सोबत करणं... तिचं तिच्या भावावर असलेलं अपार प्रेम आणि त्यातूनच कधी त्याच्या बाजूने तर कधी स्वतःसाठी, आईसाठी अस करत तिच्या त्यांच्याशी उडणार्या चकमकी.... हे सगळं सगळं आणखीही काही बाही बरचसं आठवत रहातं तिला.
आणि त्याच बरोबर हे देखील की ही कवितेशी मैत्री देखील त्यांच्यामुळेच आहे. पुस्तकांच्या दुनियेशी ओळख आणि लहानपणचा खूप सुंदर अशा हँडमेड पेपर वर छापलेल्या.. त्याकाळी महाग असणार्या अनुवादीत रशियन कथांच्या पुस्तकांच्या कलरमय जगातला वावर देखील त्यांच्यामुळेच आहे.
तिचं लग्न ठरलं तेव्हा "त्यांच" गुपचूप डोळे पुसून घेणही आठवतं आणि पहिला महिनाभर तिचं बाळ रात्री लाईट बंद करताच रडायचं तेव्हा अख्ख्या खोलीभर दिवे लावून त्यांचं दिवाळी साजरी करण देखील आठवतं
तरीही .. अजूनही अधून मधून झटका आल्यासारखं दुखेलसं बोलणारेही तेच आहेत आणि ती निघून गेल्यावर आईपाशी "मी खूप वाईट वागलो" अशी कबूली देणारेही तेच आहेत.
त्यामुळेच की काय तिला वाटायचं दारु हे जसं एक व्यसन आहे ना तसाच हेकेखोर, तापट स्वभाव हे देखील एक व्यसनच असलं पाहीजे. नाहीतर कवितांच्या दुनियेत रमणारा माणूस इतका कसा विक्षिप्त वागू शकतो!
कदाचित त्यांचं बालपण, त्यांचा स्वभाव आणि दरवेळी आलेलं अपयश ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असू शकेल... किंवा स्वभावामुळे अपयश आणि मिळणार्या प्रत्येक अपयशाबरोबर वाढत जाणारा तापटपणा असही होत असावं .
तसही प्रत्येक क्रिकेटर "सचिन तेंडूलकर" व्हायचीच स्वप्नं बघत असतो पण "सचिन" हा एखादाच असतो हे कळणं आणि कळून पचवणं जमलं नसेल त्यांना, असही तिला वाटून गेलं कुठेतरी.
म्हणूनच कितीदा ठरवलं तिने जे काय कोलाज समोर आहे त्याला प्रामाणिक पणे सामोरं जायचं. कुठचही लेबल न लावता, कसलही एडिटींग न करता, तो तो रंग मनात जसा आहे तसाच त्या प्युअर फॉर्म मधे बघायचा.
"जमेल?" मनात मगाचचा शंकेखोर एको पुन्हा उमटला.
"प्रामाणिक प्रयत्न करायला तर हरकत नाही ना?" पुन्हा एकदा मनानेच साथ देत म्हंटलं.
"पण अस जाहीर पणे व्यक्त झाल्यावर कोणी मला कृतघ्नपणाची लेबलं लावली तर? किंवा कोणी माझी कीव केली तर?" पुन्हा एक शंका उमटतेच.
"हसून सोडून द्यायचं.. सिंपल..." पुन्हा एकदा आतून उत्तर आलं.
तिने ह्याच उत्तराच्या वाटेवरुन जायचं ठरवून प्रोजेक्टर जोडून स्लाईड शो पुन्हा सुरु केला. त्यात एक कोलाज उमटलं. त्यावरुन हात फिरवता फिरवता प्रत्येक चित्रं जिवंत होत गेलं.. तसे चित्रातून पण ऐकू येणारे आवाज हळू हळू मोठे होत गेले नी तिने कान बंद करुन घेतले, तरिही ते आवाज जाणवतच गेले.
फिरत फिरत हात एका चित्रावर स्थिरावला. मोठ्या हौसेने आईच्या बुंड्या कानांकरता खाऊच्या मिळालेल्या पैशातून आईसाठी कुड्या घेऊन आलेली मुलं दिसली चित्रात, आईच्या चेहर्यावरच्या आनंदाश्रुनी आताही हात ओलावला... तेव्हढ्यात त्याच्याच बाजूला खळ्ळकन फुटून काच हातात घुसावी तसे "बाप नालायक आहे हे जगाला दाखावण्यासाठी हे सगळं केलत.." म्हणत कधीही भरुन न येणारी, अजूनही ओली असलेली जखम वागवणारं चित्र पुन्हा तशीच कळ आणून गेलं. अशा स्लाईडस मनात नेहमीच एका मागोमाग स्टोअर होत असाव्यात कदाचित कारण "त्या" स्लाईड मागोमाग "तशाच" चित्रांनी कॅन्व्हास भरुन वहायला लागला.
ती दरवेळी असं झालं की तो प्रोजेक्टरच बंद करुन टाकायची. पण आता सरत्या वर्षाला स्मरुन तिने ठरवलेलं होतं, आहे तसं त्यांना सामोरं जायचं. अस्वस्थं वाटलं... वाटून घ्यायचं, रडावसं वाटलं... रडून घ्यायचं, पुन्हा एकदा तितक्याच तिव्रतेने जीव लावावासा वाटला..... तो ही लावायचा. रस्ता चालत रहायचं मागे फिरायचं नाही त्यापासून पळायचं तर अजिबात नाही. जे जसं आहे ते ते तसं म्हणूनच स्विकारायचं. आणि त्यातल्या कोणत्याही एका चित्राला, आठवणीला नाकारायचं नाही. कारण कळत नकळत ह्या प्रवासाला त्यातलं प्रत्येक चित्रं कारणीभूत आहे.
तिच्या मनात आलं "माझं माझ्या आजच्या "मी" वर मनापासून प्रेम आहे आणि ही "मी" व्हायला प्रत्येक सल, प्रत्येक ओरखडा हा... प्रत्येक प्रेमळ अनुभवां इतकाच जबाबदार आहे. तेव्हा त्याला नाकारुन कसं चालेल?
आता तिने स्लाईड शो पुर्ण बघितला. तिच्यापुरतं विचारांचं वर्तुळ पुर्ण झालं. आता ती त्या कोलाज चित्रापाशी नव्या आत्मविश्वासाने थांबली आणि... तिने नविन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला पुन्हा एकदा मोबाईल हातात घेतला.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)