तुझी माझी प्रीत अन
पहाटेचा धुंद वारा
तुझी पहाट मिठी अन
गंधावला देह सारा
तुझ्या नाजुक देहाला
कुंतलांचा होतो भार
नित्य नवा जाणवतो
तुझ्या देहाचा थरार
जरी जुने झाले नाते
रोज नवेच भासते
तुझे हर एक रुप
मला लुभावुन जाते
एका क्षणासाठी जरी
कधी दुरावले नाते
जुन्या स्वरांची ती गोडी
तारा पुन्हा जुळविते
तारा जुळती ग जेव्हा
तुझे माझे द्वंद्व जाते
नात्यामधे अद्वैताचे
नवे फ़ुल उमलते