महागाईचा ह्या | उच्चांक रे झाला ||
फाटका हा झाला | खीसा माझा ||
भाजी घेऊ जाता | होतो बहु ताप ||
खाऊ काय काप? | बटाट्याचे ||
हापुसचा आंबा | चित्रात बघतो ||
आणि मी खातो | चीकु केळे ||
स्वप्न बघतो मी | मिळे मला धन ||
मिळता ते धन | घेऊ न्यानो ||
गरिब तरीही | लाचार मी नाही ||
कष्टाला ही नाही | घाबरत ||
एकवेळ ऐसी | चालेल गरिबी ||
नको रे गरिबी | वैचारिक ||
(मायबोलीच्या विंडबंन स्पर्धे साठी पोस्ट केलेली कविता)
गुरुवार, १२ नोव्हेंबर, २००९
ओझ्याचा बैल
नकाराच्या भीतीन मी न लिहीलेल प्रेमपत्र
रोझ डेला माझ्या हातून गळून गेलेला गुलाब
आमंत्रण येऊनही चुकवलेल तुझ लग्न
हे सारच आयुष्याच्या वळणावर
जेव्हा पुन्हा सामोर येईल
तेव्हा ओझ्याच्या बैलासारखा
वाकलेला नवरा मला दिसेल आणि त्या प्रसंगीही
मी वाचू शकेन थेट त्याच्या डोळ्यात
"साल्या, तू सुटलास नी मी झालो
फक्त ओझ्याचा बैल"
(मायबोलीच्या विडंबन स्पर्धेतली कविता)

सांग सख्या रे
सांग सख्या रे हे; असे काय व्हावे?
तू दूर तरिही; तुझे भास व्हावे!
जरी दर्पणी ह्या; मला मी बघावे
तुझे रुप त्याने; हाय दाखवावे!
श्वासही माझे; तुला फितूर व्हावे?
कसे भान नुरले, मला ना कळावे
कळीने जसे त्या, उमलुन यावे
तसे मी फुलावे, बहरुन जावे
अशी काय जादु? असे काय व्हावे?
तीर नाही तरी मी, घायाळ व्हावे
सरींनी स्वरांच्या मन चिंब व्हावे
तू सूर अन मी तुझी वेणु व्हावे
तुझे श्वास, निश्वास मी ओळखावे
सांग सख्या रे हे; असे काय व्हावे?
काय रे देवा..(संदिप खरेच्या "काय रे देवा" च्या चालीवर)
आता पुन्हा
आपली मॅच असणार
आता पुन्हा आपली मॅच असणार
मग आपण टिव्ही पुढे चिकटणार
मग सचिन चा विक्रम होणार
पण तरिही आपण मॅच हरणार
काय रे देवा..
मॅच हरलो की आपण चिडणार
मग आपण फिक्सिंग फिक्सिंग ओरडणार
फक्त अॅड करत रहा म्हणणार
दुसर्या दिवशी हीच चर्चा रंगणार
ट्रेन पासुन - चॅटिंग पर्यंत
सगळी कडे हेच असणार
तरिही पुन्हा अशीच मॅच होणार
आपण टिव्हीपुढे असेच बसणार
मग पुन्हा आपण मॅच हरणार
मग पुन्हा आपण चिडणार
त्यांच्या नावाने लाखोली वहाणार
काय रे देवा...
तावातावाने, चवी चवीने
आपण तेच तेच बोलत रहाणार
मग विषय खेळण्याचा की खाण्याचा (पैसे)
ते विसरुन भरकटणार
विषय पलटी मारत रहाणार
क्रिकेट जाऊन शब्दांचा
खो खो मात्र खेळत रहाणार
एक बोट समोर रोखुन
ऐटित वाद घालत रहाणार
चार बोट आपल्या कडची
सोयिस्कर विसरुन जाणार
काय रे देवा..
वाद काल झाले.., आजही होतायत.., वाद उद्याही होणार...

मंगळवार, १० नोव्हेंबर, २००९
ट्रेक नाणेघाटाचा - प्रवास एका इच्छाशक्तीचा..!
(जाऊन आल्यापासुन आज लिहू उद्या लिहू करत करत नोव्हेंबरची १० तारिख उजाडली. उत्साहाच्या भरात तिथुन आल्या आल्या लगेचच ड्राफ्ट लिहुन निवड्क मैत्रिणींना पोस्ट करुन झाल होत दरम्यान नेट गंडण, दिवाळी आणि सर्वात मुख्य माझा आळशीपणा ह्या सगळ्याचा एकत्रीत परिणाम म्हणुन लिखाण पुर्ण काही होत नव्हत. मग पहिला उत्साह मावळल्यावर वाटल
काय मोठासा वेगळा अनुभव आहे तर पुन्हा एक पान खर्च करा नी तेव्हढी पांढर्यावर काळी केलेली अक्षर इतरांना म्हणजे चुकुन माकुन जे मैत्रीण म्हणुन म्हणा किंवा सहज म्हणुन म्हणा वाचतील त्यांना शिक्षा केल्या सारखी वाचायला लावा?
मग पुन्हा एकदा मी माझा ड्राफ्ट वाचला. वाटलं एक वेगळा, म्हणजे नेहमीच्या ट्रेकर्सना येतो त्यापेक्षा एक वेगळा अनुभव पण आलाय की मला तिथे... ड्राफ्ट लिहायचा उत्साह देखील त्यामुळेच आला होता तेव्हा.
मग त्याच कारणा साठी पुर्ण करायला हवा हा लेख.. हे मनाशी घोकुन पुन्हा बसले टायपायला)
तर आता करते सुरुवात -- ट्रेक नाणेघाटाचा - प्रवास एका इच्छाशक्तीचा..!

(इथे पोहोचायचय आम्हाला)
बर्याच दिवसांपासुन चाललेलं विश्वेश नी त्याच्या गृपचं १०-११ ऑक्टोबरचा विकांत "नाणेघाटावर" घालवायचा. अनायसे सानुच्या शाळेला दिवाळीची सुट्टी लागत होती म्हणुन तिलाही नेतो असं त्याने आधीच डिक्लेअर केलेलं. मनातून एकीकडे मला देखील जायचं होतं. खरं खरं लिहायचं ठरवल्यावर खोट नाही लिहीणार, मला जायचं होतं त्याला दोन प्रमुख कारण होती.
जायचं ह्या यादीत सगळ्यात वरती कारण होतं "सानु".
ती बरोबर जाईल ना? तिच्याकडे बाबाचं "तेव्हढं" लक्ष राहील का दरवेळी?
अर्थात हे वाक्य तमाम बाबा लोकांच्या मते आक्षेपार्ह्य आहे ह्याची मला कल्पना आहे, पण.. आई ह्या कॅटेगरीला वाटणार्या "नको येव्हढ्या" काळजी ह्या सदरात ते मोडत असल्याने आणि सुदैवाने/दुर्दैवाने मी त्याच टाईपची आई असल्याने मला तसं वाटलं हे मी प्रामाणिकपणे इथे कबुल करतेय.
हे जरी प्रमुख कारण असलं तरी दुसर कारण हे माझ्या पुरतं महत्त्वाचंच होतं. एकतर मी असा ट्रेक ह्या आधी कधीच केला नव्हता. दरवेळी "सानिकाला घेऊन जाता येणार नाही”, “कठीण ट्रेक आहे" ह्या अधोरेखीत केलेल्या वाक्यांमुळे मी आणि सानु घरीच रहात होतो, नी ट्रेकला फक्त विश्वेशची हजेरी लागत असे.
त्याच्या गृपचे बरेच ट्रेक ओव्हर नाईट स्वरुपाचे असल्याने आठवड्यातले पाच दिवस नोकरी निमित्तम तिला घरी सोडुन जावच लागत मग पुन्हा विकांताला तिला घरी ठेवुन दोघच जाण मनाला पटायच नाही म्हणुन माझं एकतरी ट्रेक करायचाच हे स्वप्न तसच रहात होतं, ते ह्या निमित्ताने पुर्ण होणार होतं. पण दिवाळी तोंडावर आलेली असताना "दिवाळी स्पेशल" घरातली काम सोडुन असा सुट्टीचा विकांत घराबाहेर काढायचा म्हणजे आधीचे/नंतरचे दिवस घरी ओव्हरटाईम करायची तयारी ठेवावी लागणार हे सांगायला पंचांग बघायची गरज नव्हतीच, तरिही "ह्यावेळी हा अनुभव घेऊन बघायचाच" ह्या इच्छेने उचल खाल्ली नी जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मी माझीही सॅक पॅक केली.
घरातून निघाल्यापासुन मायबोली वरचे ट्रेकिंगचे लेख आठवत होते. "यो रॉक्स" तर ट्रेक मास्टर आहे त्यामुळे त्याची आठवण झाली तरी खर्या अर्थाने लेख आठवले ते "ललिता-प्रिती" नी "कायवाट्टेलते" ह्या दोघांचे. त्यात डोंबिवली - कल्याण वारी करेपर्यंतच सानुच्या पोटात दोन -तीन वेळा कळ आल्याने आमच्या ट्रेकची सांगता परतीच्या कल्याण लोकलने होते की काय अस वाटायला लागलेल.
पण नाही, इच्छाशक्ती इच्छाशक्ती अस घोकत पुढे निघालो.कल्याणहुन जीप करुन आम्ही पायथ्याच्या गावाशी (बहुतेक घाटघर) येऊन पोहोचलो. तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात हि एक्साईटमेंट ललिता-प्रितीशी शेअर करुन झाली. ह्यानंतर मोबाईलची रेंज जाणार ह्याची खात्री होती (तसाही माझा मोबाईल नेहमी आउट ऑफ कव्हरेज एरियाच असतो त्यावरुन मला...”फेकुन दे तो तुझा फोन" असा प्रेमळ सल्ला देखील ऐकावा लागतो हा भाग वेगळा )
"वेलकम टू नाणेघाट" ह्या बोर्ड ने आमच स्वागत केल नी दुप्पट उत्साहाने आम्ही सगळी मरगळ विसरुन चढण्यासाठी आतुर झालो.

इथुन सुरु झाला आमचा ट्रेकचा प्रवास.एकुण २२ जणांच्या चमु मधे सानिका धरुन आम्ही चौघे पहिल्यांदा ट्रेक करणारे वीर होतो. सुरुवात तर मस्त झाली. वाटेत २ का ३ ओढे लागल्यावर तिथेच पाय सोडुन बसायचा मोह झाला खरा, पण कॅप्टनच्या "हाकाराच्या शिट्टी" मुळे तो बेत रहीत करुन "येताना इथे थांबुयात्" ह्या अश्वासनांवर मनाची समजुत काढुन आम्ही मार्गस्थ झालो.
जस जस चढाव चढु लागलो तस तस नेहमीचे ट्रेकर्स आणि आम्ही ह्यात अंतर पडु लागल. (हे तर होणारच होतं म्हणा, एरव्ही कुठे आलेय इतक चालायची सवय ते ही पाठीवर ओझं घेऊन!)
मला गावकर्यांची खरी कमाल वाटते काय झपाझप चढत उतरत होते ते. एका गावकर्याच्या टोपलीत खेकडे होते. नाणेघाट चढुन वरच्या पठारावरच्या भागात खेकड्यांची बीळं आहेत तिथुन खेकडे पकडुन नाणेघाट उतरुन घाटघर किंवा मुरबाड च्या बाजारात ते विकायचे हा त्याचा पोटापाण्याचा धंदा.
केव्हढी ती कसरत नी मेहनत पोटाची खळगी भरण्यासाठी? मला मात्र त्यावेळी माझाच भाजी किंवा तत्सम गोष्टी घेताना १-२ रुपयांसाठी घासाघीस करुन गड जिंकल्याचा आनंद व्यक्त करणारा चेहरा डोळ्यासमोर वाकुली दाखवत होता.
हळु हळु आमचा स्पीड चांगलाच मंदावला. शेवटी कॅप्टन ने आघाडीच्या वीरांना पुढे केव्हजच्या साफसफाईसाठी जाऊ देऊन दोन तीन ट्रेकर्स चा गृप आमच्या सारख्या नवख्यांसोबत ठेवला. सुरुवातीची बडबड संपुन आता फक्त जोर जोरात घेतलेले श्वासांचे आवाज येत होते स्वत:चे स्वतःलाच.
"कॅप्टन अजुन किती वेळ?" ह्या प्रश्नाला दरवेळी "और बस १० ही मिनीट, हे काय आलच" अस उत्तर मिळत होत. (आणि हे और बस दस मिनिट चांगल दिड दोन तास चाललेलं.) इतक चालायची सवय नसलेल्या पायांना चुचकारत माझ आपल चालण चालु होतं. पुढे पुढे तर स्पिड सोडुनच द्या पण प्रत्येक वळणाला "अरे! जरा थांबुयात. आजुबाजुच निसर्ग तर अनुभवुयात.." असा बहाणा करुन विश्रांती घेणं चालु होतं.
आता फक्त एकच वळण, कमॉन कविता तू चढू शकतेस अस माझं मीच माझ्या पायांना ओढत स्वतःशी म्हणत, एकदाचा हा दिड तासाचा ट्रेक तीन तासात का होईना पुर्ण करुन वरती झेंडा लावला.
समोर कॅप्टन बरोबर आधी पोहोचलेली सानिका मला आमची केव्हजमधली जागा दाखवत होती.
"आई, आपण इथे झोपायचं, इथे रुचा काकु,इथे हे काका नी तिथे अमुक तमुक अशी विभागणी तिची तिचीच करुन झालेली."

(ते दोन दिवस हे आमच घर होतं)

(केव्ह्जच्या बाहेरच्या बाजुला असलेली हनुमंताची कोरीव मुर्ती)
आधी पोहोचलेल्यांनी साफसफाई करुन स्लिपिंग मॅटस अॅरेंज करुन ठेवलेल्या होत्या.
सानिकाला मात्र हे दाखवु आईला का ते अस झालं होतं.
"आई, इथे बघ पाणि आहे प्यायच. एकदम थंड, फ्रिज नसताना..!" तिचा जगातल सातव आश्चर्य बघितल्यासारखा चेहरा अस काही बाही सतत मला दाखवत होता.
"इथे बघ इथुन काय सुरेख दिसतय खालच..अस म्हणत माझा हात धरुन ती मला केव्हजच्या बाहेरच्या बाजुला घेऊन गेली."
ते दृश्य नी टाकांमधल थंडगार पाणि पिऊन सगळा थकवा, दुखणारे पाय विसरायला झालं.

(वदनी कवळ घेता...)

(पंच पक्वांनाच ताट..)
आणलेली शिदोरी मधोमध ठेवुन केळी सदृश्य पानांवर जेवणं झाली नी बरोबर आणलेल्या दुर्बिणीतून आलो तो पट्टा न्याहाळायचा कार्यक्रम सुरु झाला. दूरवर एक पांढरे-लाल टिशर्ट घातलेला गृप चढताना दिसत होता. आमच्या बॅगा लगेच केव्हजच्या एका बाजुला लावुन आम्ही आमची साईड सिक्युअर करुन घेतली. नविन येणारा गृप राहिलाच तिथे तर समोरचा एक भाग त्यांच्या साठी राहिल अस आमच सामान लावुन टाकलं नी रपेटी साठी निघालो.
सर्वात प्रथम "टोल स्पेशल" रांजण बघितला.

(रांजणा कडे जाणारा रस्ता)

(सातवाहन काळात ह्याचा जकात वसुली साठी उपयोग व्हायचा)

मग तसेच चालत पुढे जाऊन एका गावकर्याच्या घरी थोडी विश्रांती घेऊन त्यालाच वाटाड्या म्हणुन बरोबर घेऊन निघालो. "इथे वीज पडली होती", "इथे धबधबा आहे" , "इथे फायस्टार (त्याच्याच भाषेत लिहितेय) हॉटेल होणार होत", "ही मिलिंद गुणाजीची १ मजली बंगली" अस काही बाही तो दाखवेल ते बघत पुन्हा परतताना त्या वाटाड्याच्या घरी चहा पिऊन आम्ही नानाचा अंगठा चढण्यासाठी निघालो.

(मिलिंद गुणाजीच्या बंगलीच्या अलिकडचा परिसर.इथेच कुठेतरी गुणाजी कडाचा मिलिंद गुणाजीने लावलेला नी गावकर्यांनी काढुन टाकलेला फलक बघायला मिळाला)

(समोरच्या बाजुच्या ह्या डोंगर रांगेला "नवरा-नवरी करवली व वर्हाडी असं नाव आहे)

(मिलिंद गुणाजीच्या बंगली समोर उभ राहुन घेतलेला आमच्या गृपचा फोटो)
सुर्यास्ताच्या आधी तिथे म्हणजे नानाच्या अंगठ्यावर पोहोचायचं होतं.

(हा नानाचा अंगठा)
सानिका तिच्या महेंद्र काकांबरोबर माझ्या आधी वरती पोहोचली होती. सुर्यास्त व्हायला थोडाच अवकाश बाकी होता. कॅमेरे सरसावले. मी डोळ्याच्याच लेन्सने टिपायच ठरवल नी एकटक समोर बघत राहिले. एका हाताने सानुला घट्ट पकडुन ठेवल होत नी लक्ष समोरच्या लाल गोळ्याकडे होतं. सगळ आभाळ अस नजरेच्या टप्प्यातं. हळु हळु आपल्या सहस्त्र किरणांनी आम्हाला टाटा बाय बाय करत सुर्यनारायण त्यांच्या घरी गेले.

कितीही रेंगाळावस वाटल तरी भरभर केव्हज कडे जाणं भाग होतं. कारण सुर्यबाप्पा अस्ताला गेल्यावर थोड्याच वेळात अंधाराच राज्य सुरु होणार होतं. सात साडे सातलाच रात्रीचे १० वाजले असावेत इतका काळोख होता (खरतर शहरात कधीच रात्र नसते. The City that never sleeps अस नाहितरी मुंबापुरीला म्हणतातच. तर तिथे आम्ही खर्या अर्थाने अंधाराच साम्राज्य अनुभवलं)
अशा अंधारातच आम्ही आमचं कँडल लाईट डिनर केलं, दुसर्या दिवशी सकाळी चूल पेटवुन पोहे केले. खानविलकर काकांनी खास सानु साठी मॅगी करुन दिल (मॅगी चांगल नसत म्हणुन आई फारफार कमी वेळा करते अशी तिची माझ्या विषयी तक्रार सुद्धा करुन झाली) आणि हो ट्रेकच्या नियमाला अनुसरुन परत येताना आमच्या ग्रुपची चुकामुक देखील झाली. येताना बच्चे कंपनीच नी काही मोठ्यांच पण ओढ्यामधे मनसोक्त डुंबुन झालं. कपडे बदलायची सोय नसल्याने आम्ही पाय बुडवण्यात समाधान मानलं.
खाली उतरल्यावर खरतर कॅप्टनला ११ नंबरच्या बसने सगळ्यांना कल्याणला किमानपक्षी मुरबाड रोड पर्यंत न्यायच होत पण आमच्या दुखणार्या पायांनी नी पोटात खवळलेल्या भुकेनी त्याच्याशी असहकार करत तिथेच पथारी पसरली. आय आयटी मुंबई वाल्यांचा गृप आम्ही उतरत असताना चढत होता. त्यांच्याच बस वाल्याला रिक्वेस्ट करुन थोडे पैसे देऊन घाटघर पर्यंत आलो. तिथुन मुरबाड पर्यंत एक जीप नी पुढे कल्याण पर्यंत दुसरी अस करत आम्ही कल्याणला येऊन पोहोचलो नी हॉटेल गुरुदेव मधे पोटपुजा करुन आमच्या ट्रेकची उत्तर पुजा पुर्ण केली.
खरच, कल्याण ट्रेननेच सांगता झाली ट्रेकची पण ट्रेक पुर्ण करुन मगच.
--------------
आता विचाराल ह्यात कसला आलाय वेगळा अनुभव? हेच तर सगळ म्हणजे असच काहिस ललिताने किंवा काय वाट्टेलते ने लिहीलय की. मग वेगळा अनुभव नाही तर वेगळ ललित कशासाठी खर्च केलस? तिथे त्यांच्या लेखातच प्रतिसाद मधे लिहायच ना! मला माहित आहे असच काहिस येतय तुमच्या मनात.
हम्म थोडंफार खरय, पण थोडं फारच. कारण दमण जरी तसच असलं, इच्छाशक्तीही तशीच असली, वरती पोहोचल्या वरचा आनंदही तसाच असला तरिही हा ट्रेक एका वेगळ्या कारणा साठी मनावर कोरला गेलाय. आणि हे वेगळ कारणच मला लिहायला भाग पाडतय.
ज्या कारणासाठी हा ट्रेक विशेष करुन लक्षात राहिला ते मुद्दामच शेवटी नमुद करतेय कारण मला वाचताना तेच तेव्हढ लक्षात रहाव अस मनापासुन वाटतय.
आम्ही जेव्हा केव्ह्ज मधे परतत होतो तेव्हा "तो" दुपारी दुर्बिणीतून बघितलेला गृप हळु हळु वर चढत होता. "हा गृप, ह्या गृपचे ट्रेकर्स हाच तर वेगळेपणा आहे मला आलेल्या अनुभवात"
ह्या गृपविषयी सांगण्या पुर्वी मला एक सांगा...ट्रेक कशाच्या जोरावर पुर्ण होते?
स्टॅमिना..?
ट्रेकची सवय..?
शारिरी़क ताकद..?
हम्म! लागत असतील ह्या गोष्टी पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे "इच्छाशक्ती" हे मला त्यादिवशी कळलं जेव्हा मी "फिनिक्स" ह्या संस्थेचे "जवान" हा ट्रेक पुर्ण करत असताना बघितले.आम्ही दुर्बीणीतुन बघितला होता तो हाच गृप फिनिक्स च्या जवानांचा.
फिनिक्स ही तुमच्या आमच्या दृष्ट्या शारिरीक अपंगांची संस्था. कोणी पोलिओने पाय गमावलेत, कोणी अपघातात गमावलेत, कोणाला कृत्रिम पाय लावलाय, कोणाचा स्टिलचा पाय गुढग्यात वाकु शकत नाही अशा लोकांचा हा समुदाय जवळ जवळ २५०० फुट उंच अशी नागमोडी वाट चढतो तेव्हा स्टॅमिना,शरिराची ताकद ह्यापेक्षा त्यांची मनाची उभारी, दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याला त्या डोंगरा पेक्षाही उंच भासते.

(फिनिक्स चे हेच ते जवान वीर... केव्हजच्या इथे विश्रांती घेत असताना काढलेला फोटो)
शारिरिक अपंगत्वावर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर विजय मिळवता येतो.. हा धडा मी त्यादिवशी शिकले.
हॅटस ऑफ टु देम यार.. म्हणुन हा स्वतंत्र लेखाचा प्रपंच त्यांना मानाची वंदना देण्यासाठी, त्यांची धडपड त्यांचा उत्साह तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठीमला दम लागला, माझी चढताना "नाही बॉ जमत आता मला" "मला नाही वाटत मी पुढचा काय हा ट्रेक पण पुर्ण करेन" अशी अवस्था एक नाही अनेक वेळा झाली. ह्या पार्श्वभुमीवर ह्या वीरांचं यश हे खरच कौतुकास्पद आहे. तुम्हा आम्हाला एक धडा शिकवणार आहे.
हा गॄप ह्या आधीही बर्याच गडांना पावन करुन गेलाय हे कळतं तेव्हा हाती पायी धडधाकट असलेल्या आपल्या सारख्या लोकांनी "किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडायचं?" अस स्वतःलाच विचारावसं वाटत. असं वाटायला लावणं हे माझ्या ह्या झालेल्या ट्रेकचं यश वाटलं, म्हणुन इथे तुमच्या समोर मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला.
पुढच्या वेळी ट्रेक करताना "नही जमेगा" वाटल ना तर हा गृप आणा डोळ्यासमोर. शिव खेराच "येस यु कॅन" न वाचता देखील समोर उभं राहिल ही खात्री मी देते.
(ह्या गृपच्या ह्या ट्रेक विषयी म.टा. मधे पहिल्या पानावर १३ ऑक्टोबरला बातमी आली होती)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5117535.cms (ही त्या अर्टिकलची लिंक)

रविवार, २५ ऑक्टोबर, २००९
ती...स्वप्नपरी..!
सवयीने घड्याळाकडे नजर गेली. नऊ वाजले, म्हणजे 'ती' आता बसस्टॉपवर उभी असेल तिच्या मैत्रिणींबरोबर. घरातून निघून गाडीत बसल्याबरोबर मन तिचाच विचार करायला लागतं आजकाल. बसस्टॉप जवळ आला, की आपसूकच लक्ष घड्याळाकडे जातं.
ती दिसायला काही खूप सुंदर नाही, तरी तरतरीतपणा जाणवतोच. केस थोडेसे पोनीटेलमधून बाहेर आलेले, कपाळावर टिकली, क्वचित कधी साडी... म्हणजे सणासुदीला. एरवी सलवारसूट किंवा ट्राउझर आणि थोडा लाँगच कुर्ता अशीच असते ती. एखाददिवशी हलकी लिपस्टिक. एका हातात दोन बांगड्या... बहुतेक सोन्याच्या असाव्यात नि एका हातात घड्याळ, बस बाकी काहीच मेकअप नाही. तिची उभं राहायची जागासुद्धा ठरलेली. स्टॉपवर हीऽऽ भली मोठ्ठी रांग दिसते बससाठी. पण ही, मैत्रिणींबरोबर रांगेच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला उभी दिसते. बहुतेक मिळेल ती बस पकडून लटकून जात असावी. एक दिवस गाडी बाजूला उभं करून बघितलं पाहिजे. का तिलाच लिफ्ट द्यावी एक दिवस?
ह्या विचारानेच हसू आलं चेहर्यावर. जे शक्य नाही, त्याचंच का मन स्वप्न बघतं? पाच मिनिटांत गाडी बसस्टॉपपाशी आली. सगळ्या विचारांना आवरून डोळे तिला शोधायला लागले. तिचा ग्रूप होताच तिथे, नेहमीसारखाच हसत चेष्टामस्करी करत. पण ती नव्हती त्यात. काय झालं असेल? बरं नसेल का तिला? की गाडी चुकली असेल तिची? खरंच रोज लटकून प्रवास करणार्यांना साष्टांग दंडवतच घातला पाहिजे. सकाळी लवकर उठत असेल नाही ती? सगळं आटोपून धावतपळत ट्रेन गाठून यायचं, म्हणजे तारेवरची कसरतच होत असेल तिची. पण तरी किती फ्रेश दिसते ती... पूर्ण ग्रूपच तसाच म्हणा त्यांचा. तरी ती विशेष जवळची वाटते. कारण ठाऊक नाही. त्या रोजच काहीना काही बोलत असतात, हसत असतात. किती आनंदी इन्फॉर्मल वाटतात त्या!
क्वचित, अशा ह्या पावसाळ्यात जवळजवळ पूर्ण भिजलेल्या अवस्थेत बसची प्रतीक्षा करणार्या त्यांच्या चेहर्यांवर थोडा वैताग, नाराजी त्याहीपेक्षा मस्टर गाठून लेटमार्क टाळायची घाई किंवा त्यापायी आलेली चिंता दिसते... पण तरीही एक मोकळेपणा, खरेपणा, एक... एक वेगळंच स्मित, तेज असतं त्यांच्या चेहर्यांवर.
कुठून येतो एवढा उत्साह? थोडंसं का होईना स्वत:चं आकाश दिसतं, म्हणून येत असेल का?
तिलाही कळत असेल का माझं हे असं रोज तिचं निरीक्षण करणं? असावं बहुतेक.
आज काय झालं पण तिला? आता पूर्ण दिवस तिच्याच विचारात जाणार. धड ना काम होणार, ना माझे विचार संपणार...
"मितू, मी पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाणारे. तिथे त्या कपूर अँड कपूरचं डील जवळजवळ फायनल झालंय. तो आठवडा इथले क्लाएंट्स तेवढे तुला मॅनेज करावे लागतील. त्या माथुरबरोबरची मीटिंग साळवींना घेऊन अटेंड कर. तो साऽला xxx असला तरी आपला इथला मोठ्ठा मासा आहे.. अगं, लक्ष कुठे आहे तुझं?"
"अं..अं..! नाही, काही नाही. जरा वेगळे विचार होते डोक्यात. सॉरी, काय म्हणालास?"
"मी इथे कपूरच्या डीलची गोष्ट करतोय.. हे डील फायनल झालं, की आपणही एसी गाडी घ्यायची. आजकाल ही असली साधी गाडी कुणाकडेही असते."
"अरे, पण ही काय वाईट आहे?" मी नाराजीच्या स्वरात म्हटलं. "आणि तुला माहीत आहे, मला ती बंद काचवाली एसी गाडी आवडत नाही, जीव घुसमटतो माझा त्यात. जगापासून तुटल्यासारखं वाटतं."
"तुझं आपलं काहीतरीच! म्हणे जगापासून तुटल्यासारखं वाटतं.. आणि खिडकी उघडून बाहेर बघायचं तरी काय? ती गर्दी, त्यात धक्के खात बसची वाट बघणारी माणसं? म्हणजे जे नको, म्हणून ही अशी स्वतःला विसरून मेहनत केली, तीच पुन्हा बघायची? बघायचंच असेल, तर मेहराकडे बघ, त्या माथुरकडे बघ. साले बापांच्या जिवांवर कसे ऐष करतायत, दोन-दोन एसी गाड्या बाळगून आहेत. तुझीच इच्छा होती ना, आपली स्वत:ची कंपनी असावी, बंगला असावा, गाडी असावी म्हणून? तुझं ना गणितच मला कळत नाही, अक्षता झाल्यापासून अधिकच बिघडलंय गणित!" इति शेखर.
'तुलाच काय मलाही कळेनासं झालंय माझं गणित' मी मनातच म्हटलं. हेही खरंय, माझीच इच्छा होती. पण मला नव्हतं रे ठाऊक मी हरवून जाईन ह्या सगळ्यांत. त्या सुरुवातीच्या काळात क्लाएंट मिळवण्यासाठी अटेंड केलेल्या पार्ट्या, काही आपण दिलेल्या.. ते चकचकीत दिखाऊपण, खोटं हास्य ह्यात कोणी खरं जवळचं, जिवाभावाचं जोडलंच गेलं नाही. जे होते, ते पाऽऽऽर लांब गेलेले आपल्यापासून...
'अजून काही वर्षं, अजून हे होईपर्यंत...' असं करत करत तू पार पुढे निघून गेलास. तुझा दोष नाही म्हणत मी, पण अक्षता झाल्यापासून माझी माझ्यातच हे दोन दुवे जोडताना दमछाक होते. पूर्वी वाटायचं, पैसा नाही किंवा कमी आहे म्हणून आपण सुखी नाही. आता वाटतं, हे धावणंही एक मृगजळ आहे. सुख, समाधान आतातरी कुठे आहे?
"हे सगळे मीडिऑकर विचार झाले मितू. जरा आपल्या स्टेटसप्रमाणे वाग. कंटाळा आला असेल, तर शॉपिंगला जा, कालच मिसेस मेहरांचा फोन आला होता ना तुला? किटीपार्टीला बोलावत होत्या म्हणालीस ना? तिथे जा. पैशांचा विचार करू नकोस. खर्च कर, राणी खर्च कर."
"गेलंच पाहिजे का तिथे? माझं मन नाही रमत अशा पार्टीत. काय आपलं दागिन्यांचं नि साड्यांच प्रदर्शन केल्यासारखं मिरवायचं?"
"Now stop crying, for God's sake! खोटं का होईना, पण रमता आलंच पाहिजे तुला अशा पार्टीत. त्याला बिझिनेस एटीकेट्स म्हणतात मॅडम. इस रेसमें आगे जाना है, तो ये सब करना पडता है."
"रेस, पैसा, एटीकेट्स ह्यांशिवाय दुसरं जगच नाहीये का शेखर? किती बदललास तू! दिवसचे दिवस आपला संवाद फक्त क्लाएंट, डील्स, गुंतवणूक ह्या नि अशाच गोष्टींमध्ये फिरतोय, लक्षात येतंय का तुला? त्यापेक्षा पैसा कमी होता, तेव्हा बरं होतं असं वाटायला लागलंय मला. निदान आपलं विश्वतरी एक होतं, स्वप्नं एक होती. मला खोटंखोटं हसत स्टेटसचं घोंगडं पांघरून प्रदर्शन करावं लागत नव्हतं. भले धावपळ होत होती, दाराशी गाडी नव्हती, पण तू आणलेला एक गजराही मला खुलवायला पुरेसा होता. आता वाटतं मीच पायावर धोंडा मारून घेतला माझ्या."
"तुला विश्रांतीची गरज आहे, बाकी काही नाही. मी परत आलो, की चार दिवस कुठेतरी जाऊन येऊ. तुलाही बरं वाटेल."
"ठीक आहे, तू म्हणशील तसं." असं म्हणत मी विषय संपवला. कारण तुझं पुढचं वाक्य मला पाठ झालेलं-'भावनांपेक्षा पैसा महत्त्वाचा राणी, पैसा हवा पैसा.. छन् छन् छन्...' मन मात्र तिच्याच विचारात गुरफटलं....
***
श्शी! आज खूपच उशीर झाला. सगळ्या गेल्या असतील आज. सकाळीसकाळी जरा दहा मिनिटं आरामात उठू म्हटलं एक दिवस, तरी बिघडलंच चक्र सगळं. नेहमीची गाडी चुकली, म्हणजे आलंच उभ्याने जाणं. सकाळी सगळ्या धावपळीत फुरसतीने एका जागी बसून चहासुद्धा प्यायला मिळत नाही कधी, ना पेपराचं तोंड बघायला मिळत. तशी ऐश करायला जावं, तर पळणारे घडयाळाचे काटे समोर दिसतात राक्षसांसारखे.
'तरी नशीब आजकालचे नवरे त्यांच्या बायकांना मदत करतात,' घराबाहेर पडतापडता हे वाक्य कानांवर येऊन आदळलंच नेहमीच्या सवयीने. गंमत वाटते ह्या वाक्याची, पण खरंही आहे म्हणा. तरीही वाटतं, किती हा सेकंदासेकंदाचा हिशोब, कसं हे काट्यावरच जगणं....?
अग्गंबाई! आज चढायलातरी मिळणार का गाडीत? आत्ताच ८.१५ होऊन गेलेत.. अजून इंडिकेटरही लावला नाहीये. आता आलीच गाडी नि चढले धकून त्यातच, आणि ती गेली जरी वेळेवर तरी ९.१५ - ९.३० होणार बसस्टॉपवर जाईपर्यंत. किती ते जर-तरचे डोंगर पार करायचे? आज तरी जायला हवं होतं नेहमीच्याच ट्रेनने. सगळ्या बरोबर असत्या, तर उभ्या उभ्या प्रवासाचं काही वाटलं नसतं.
९.३० झालेच शेवटी, आता बसच्या प्रतीक्षेत किती वेळ जातो कुणास ठाऊक! बस पटकन मिळाली, तर आजचा लेटमार्क वाचेल. बाकीच्या गेल्या असतील नेहमीच्या वेळेला.
'ती'सुद्धा गेली असेल, मस्त स्वतःच्या गाडीतून, खिडकीशेजारी बसून, वार्यावर उडणारे केस सारखे करत.. काल काय मस्त गुलाबी रंगाची लखनवी साडी नेसली होती तिने. तिच्या रंगाला खुलून दिसत होती. माझी लखनवी साडी दहा वेळा बाहेर काढून कपाटात ठेवली. कधी उशीर झाला म्हणून, कधी गर्दीच्या वेळी ऑफिसात पोचेपर्यंत पार चोळामोळा होईल म्हणून.. 'तिच्या सारखी गाडी असती तर.....!' तेवढं कुठचं भाग्य म्हणा. मग आहेच हाताला लागलेला पंजाबी ड्रेस - तोही शक्यतो पावसात, गाडीच्या गर्दीत चालेल असा. नाहीतर ट्राउझर झिंदाबाद. किती 'तिचा' विचार तो? 'तिच्या' खिजगणतीतही असू का आपण?? कशी भुर्रकन निघून जाते एखाद्या परीसारखी!
आणि केलाच जरी तिने विचार आपला, तरी काय.. कीवच करत असेल आपली.
***
हेवा.. हेवा वाटतो मला 'तिचा'! माझं मन अजूनही तिचाच विचार करत होतं. दगदग झाली, धावपळ झाली, घर चालवताना थोडीफार काटकसरही करावी लागली तिला, तरी ती राणी आहे तिच्या जगाची. निदान तिला मैत्रिणी आहेत, त्यांच्याबरोबर थोडाकाळ का होईना हसायचं, मनसोक्त मस्करी करायचं स्वातंत्र्य आहे तिला. तिचं हसू कसं स्वच्छ आहे एकदम, आकाशाच्या तुकड्यासारखं. नाहीतर मी.. काच खाली केली, तरी शेवटी खिडकीच्या चौकटीत दिसेल तेवढंच माझं आकाश नि तेवढंच माझं स्वातंत्र्य. नाही म्हणायला दिमतीला गाडी आहे. गाडी घेऊन कुठेही भटकायचं स्वातंत्र्य आहे, पण ह्याच्या इभ्रतीला शोभेल असंच.. म्हणजे किटीपार्टी, मॉल, मल्टीप्लेक्स वगैरे वगैरेच. त्याच्या म्हणण्यानुसार हाय स्टेटस जगायचं. सगळी सुखं विकत घेता येतील, इतका पैसा मिळवायचा आणि तो उपभोगायचासुद्धा. अक्षता दिमाखात गाडीने शाळेत जायला हवी, तेही IB School मध्ये. जे जे बेस्ट, ते ते सगळं तिला द्यायचं. त्यासाठी ह्या पार्ट्या आवश्यक. त्यातूनच क्लाएंटशी ओळख वाढते म्हणे. असेलही खरं त्याचं, पण त्यामुळे माझ्या ओळखीचा शेखर धूसर होत चाललाय ना, की मीच चुकतेय कळत नाही. आईलाही वाटतं माझंच चुकतंय, हे भिकेचे डोहाळे आहेत म्हणते...
पण मन परत परत 'तिच्या'भोवतीच फिरतंय. ती, तिचं जग, तिचा उत्साह, तिचा दमलेला तरीही आनंदी चेहरा... सगळं परत जुन्या 'मिता'पाशी घेऊन जातं. आरशात बघावं तसं. तिच्यात जुनी मिता शोधता शोधता, जुना शेखरसुद्धा कुठे हरवला ते शोधायला जावं, तेव्हा उमजतं कधी काळी किती चुकीचं गणित मांडल होतं आपण. दगदग, धावपळ करूनही तिच्या चेहर्यावर जो आनंद, समाधान दिसतं, ते मला गाडीतून प्रवास करूनही का मिळत नाही? तिच्याकडे गाडी नाही, तरीही ती आनंदी दिसते. शेखर म्हणतो तसं मिडिऑकर जगणं जगते ती, तरीही इतकी उल्हसित कशी असते? का तिच्या जगात अजूनही भावनांचंच पारडं झुकलेलं आहे म्हणून असं होतं? ते स्मित, तो उत्साह, ते समाधान मला ह्या ऐषारामात मिळत नाही, म्हणून मला तिचा हेवा वाटतो.
कितीतरी दिवस ठरवतेय वाळूत अनवाणी चालायचं. घामाच्या वासांनी गुदमरले तरी चालेल, पण गर्दीत हरवून जायचं. एकदातरी ही परीटघडी विसरून माणूस म्हणून श्वास घ्यायचाय. जमेल का? सतत स्टेटसचा विचार, त्याच त्याच लोकांशी बिझनेस पार्टीज, 'सोशल'च्या नावाखाली खोटंखोटं हसणं. ह्यालाच सुख म्हणतात का? बिझनेस एटीकेट्स, बिझनेस मॅनर्स, बिझनेस ग्रूप नि बिझनेस गप्पा.. इतके मिळवले, इतके गुंतवले.. नवीन गाडी घेतली, मग त्या अॅचीव्हमेंटचं प्रदर्शन म्हणून फॉर्मल पार्ट्या. तशीच बायको नावाची वस्तू ह्या सगळ्या अॅचीव्हमेंटपैकी एक.
पूर्वी असं अगदी नव्हतं ना...
कुणालाच त्रास होत नाही ह्याचा. ना आईला, ना बहिणीला, ना वहिनीला, भावाला, बाबांना, दिराला, नवर्याला. कुण्णाकुण्णालाच होत नाही. मग मलाच का होतो?
का मन सारखं सारखं बंद दारावर धडका मारतं? सोन्याचा झाला तरी हा पिंजराच शेवटी, असं मलाच का वाटतं?
***
शेवटी लेटमार्क लागलाच. हा या महिन्यातला दुसरा लेटमार्क! अजून एक झाला, तर हाफ डे कट होणार... मनूच्या वाढदिवसाला एक सुट्टी नक्की आहे. तरी नशीब सध्या कुणाची लग्नकार्यं नाहीयेत.. श्रावणातली सवाष्णदेखील आता सोयीने रविवारी चालते, सवाष्ण जेवायला येणारीला तरी कुठे सुट्टी घेणं परवडतंय त्यासाठी? तरीही सुट्ट्या वाचवायला हव्यात. आजारपणं, न जाऊन चालणार नाही अशी लग्नकार्यं नि अजून काय काय. तिथे सुट्ट्या जाणारच आहेत, अशी लेटमार्कपायी गेलेली फुकटची सुट्टी नाही परवडायची.
असा विचार करत करत टेबलापाशी येऊन कामाला लागताच ऑफिसमध्ये असलेल्या एसीचा सुखद गारवा मनालाही थंडावा देऊन जातो नि त्यासरशी एसी=श्रीमंती, एसी=सुखवस्तूपणा असा विचार मनात शिरताशिरताच तो गारवा 'तिची', त्या 'गुलाबी लखनवी साडीवाल्या परीची' आठवण करून देतो.
मज्जा असेल नाही तिची. गाडीची गर्दी सहन करणं नको, घामाच्या बजबजपुरीत घामेजलेलं होऊन निघणं नको, इस्रीची पार वाट लागेल म्हणून दहा वेळा विचार करून साडीची घडी मोडणं नको आणि आज काय पाणी साठलं म्हणून ट्रेन लेट आहेत, उद्या काय ओव्हरहेड वायर तुटली म्हणून खोळंबा आहे, असली कारणंही नकोत. मस्त गाडीत बसायचं, परीटघडीचे कपडे जस्से सकाळी, तस्सेच शेवटपर्यंत संध्याकाळी. नाहीतर आम्ही! कॉटनची साडी तर नेसायलाच नको गर्दीत. आणि मस्त नवर्याबरोबर ऑफिसला जायचं. नवराच सोडत असेल तिला. म्हणजे ओझरतंच बघितलंय बसस्टॉपवर उभं असताना, पण निमालाही नवराच वाटलेला तो तिचा. शोफर नसावाच तो. किती गप्पा मारतमारत, हसतखेळत जात असतील ना दोघं. नाहीतर आम्ही... फोनवर फक्त विचारणार - 'आज काय आणायचंय? काय संपलय? ह्यांव नि त्यांव'. गप्पा मारायला ना त्राण, ना वेळ. काही वाटलं, खुपलं, आवडलं, तर पहिले कळणार आमच्या ग्रूपला, ट्रेनमध्ये. कारण तोच तेवढा आमचा आमच्यासाठी विचार करायचा वेळ.
म्हणून तर, पेपर वाचायचा, ट्रेनमध्ये.
यादी करायची, ट्रेनमध्ये.
केळवण, हळदीकुंकू, डोहाळेजेवण, सगळं ट्रेनमध्येच.
"हॅलो! हॅलो!"
"हम्म, बोला.."
"अगं पोचलीस का नीट? आज लेट होत्या ना गाड्या? बसायला मिळालं का थोडावेळ तरी? बरं, आज निघालीस. की मला आठवण कर - येतानाच मनूचा युनिफॉर्म घेऊन यायचाय इस्रीवाल्याकडून, नाहीतर रात्री पुन्हा धावपळ होईल. आणि काहीतरी मागवून खा बाहेरून, आज नाष्ट्याचा डबा घरीच विसरलीस धावपळीत."
"होऽऽ, मागवते काहीतरी आणि करते तुला फोन नंतर. चल, ठेवू आता? आधीच लेटमार्क झालाय म्हणून साहेब खवळलाय" म्हणत मी फोन ठेवला नि कामाला लागले.
अशी अधूनमधून चौकशी करतो, नाही असं नाही. पण काल म्हटलं, 'ती नॅनो काय आलेय ना टाटाची. तर करूयात का SBIमध्ये लोनसाठी अर्ज?' तर म्हणे, 'हवीये कशाला कार? आपण रोज करणार ट्रेनचीच सवारी नि त्याच्या पेट्रोलसाठी दुसरं लोन काढावं लागेल त्याचं काय?'
थोडीही महत्त्वाकांक्षा नाही ह्या माणसात. कित्ती स्वप्न बघते मी, आमचं स्वतःचं घर असेल, घरापुढे बाग, एकतरी गाडी. एसी नसली, तरी चालेल. रोज ट्रेननेच जायचं झालं, तरी कधीतरी कुठे जायचं झालं की आरामात-सुखात, परीटघडी विस्कटेल, गर्दीत जीव घुसमटेल ह्याची पर्वा न करता जाता येईल. तो, मी नि मनू. टॅक्सी केली, तरी स्वतःच्या गाडीचं सुख मिळणार आहे का?
किती दिवसांत आमचे आम्ही म्हणजे मी, नवरा नि लेक कुठे गेलो नाही आहोत. कधी मिळेल तिच्यासारखं गाडीतून फिरायला? मग ती गर्दी नको, घामाची घुसमट नको नि परीटघडी मोडते म्हणून लखनवी साडी परत कपाटात ठेवणं नको.
हम्म! पुन्हा रमलं मन स्वप्नरंजनात...
***
काय झालंय मला? पुन्हा वेडं मन स्वप्नं बघायला लागलं. खरंच कधी हसू शकेन मी तिच्यासारखी मनमोकळं? कधीतरी मिळतील का मलाही सख्या जिवाभावाच्या - तिच्या ग्रूपसारख्या? अशी एकतरी जागा असेल का, जिथे मी हसू शकेन, रडू शकेन, मोठ्याने ओरडू शकेन, हा स्टेटसचा मुखवटा फेकून?
पूर्वी कधीतरी आईला, बहिणीला नि अगदी माझ्या जन्माचा सोबती असलेल्या नवर्यालाही हे सांगून बघितलं. सगळ्यांनी 'काय वेड लागलंय हिला,' असं बघितलं माझ्याकडे. खरंच का हे इतकं वेड्यासारखं मागणं आहे? का सतत पैसा एके पैसा नि पैसा दुणे पैसा अशा व्यापारी जगात मन नावाच्या गोष्टीला जागाच नाहीये?
किती सुखी असेल ना ती! कामावरून दमून घरी गेल्यावर, प्रेमाने विचारपूस करणारा नवरा, करत असेलच तिची विचारपूस तो. किती उत्साही नि आनंदी दिसते ती स्टॉपवर असते तेव्हा! काय बोलत असतील ते दोघे? कदाचित वाण्याची यादी नि भरायची बिलं, एकत्र बघितलेली स्वप्नं, आपण पूर्वी बघायचो तशी... असेना का तसंच... पण संवादतरी होतो त्यांचा. एकमेकांना जाणून घ्यायला वेळतरी देता येत असेल त्यांना. थोडीतरी समजत असतील ना त्याला तिची स्वप्नं, तिचे विचार. मुखवटा घालून तरी वावरावं लागत नसेल ना तिला सदासर्वकाळ. गर्दीतून धक्के खात येतानाही तिला तिच्या जिवाभावाच्या सख्या आहेत मन हलकं करायला. मी कुठे जाऊ??
इतके महिने तिला रोज बघतेय गाडीतून. आता हा जाणारे दिल्लीला, तेव्हा द्यावी का तिला लिफ्ट? वाढवावी का ओळख तिच्याशी? आणि सांगावं का तिला, बाई गं तुला ठाऊकही नसेल, की तू कित्ती कित्ती भाग्यवान आहेस, नि हो माझ्या स्वप्नांतली परी आहेस म्हणून?
***
उद्या नाही असा उशीर करायचा. रोजची गाडी नि रोजचा ग्रूप अजिबात चुकवायचा नाही. आपल्याला काय येणार आहे का तिच्यासारखी गाडी सोडायला नि आणायला? मग उगाच का त्रास? मनोज म्हणतोय तेच खरं, सध्या आपल्याला गाडीची तशी गरज नाहीये. मनूसाठी कपाट करून घ्यायचंय, नवीन वॉशिंग मशीन घ्यायचंय, बोअरवेलचं एक कनेक्शन बाथरूममधून फिरवून किचनमध्ये घ्यायचंय. गाडी काय घेऊ पुढेमागे जमलं तर. तोपर्यंत आहेच आपली 'राष्ट्रीय संपत्ती!' तिचं जग वेगळं, आपलं वेगळं. आपण आपली झेपतील, ती स्वप्नं बघावीत हे बरं.
पण खरंच कधी चुकूनमाकून ओळख दिलीच तिने... अर्थात ती कशाला देईल म्हणा ओळख... तरीही.. दिलीच ओळख, तर सांगणार आहे तिला, 'तू खूऽऽप खूऽऽप भाग्यवान आहेस.. अगदी माझ्या स्वप्नांतली परी आहेस' म्हणून.
(पुर्व प्रकाशित मायबोली दिवाळी अंक २००९)

मंगळवार, ८ सप्टेंबर, २००९
दृष्टीभ्रम
आज आमच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस.... घराचं गोकुळ झालंय अगदी! मला तर चहाचा साधा कपदेखील कोणी उचलू देत नाहीये! प्रत्यक्ष लग्नातदेखील येव्हढा उत्साह नव्हता आमच्या! एकतर माझे आई बाबा वेगळे झालेले, त्यांच्या काळात ही गोष्ट थोडी जडच होती समाजात पचायला.... आज काल सहा महिन्यात काडीमोड झाल्याच्या घटना ऐकू येतात!
मग माझी रवानगी आई बरोबर मामाच्या घरी. आई नोकरी करायची, आम्ही थोड्याच दिवसात सिंगल रुम का होईना, पण स्वत:च्या जागेत गेलो होतो रहायला... पण शेवटी सगळ्यांचे बाबा संध्याकाळी घरी आले की एकटं एकटं वाटायचं. मग बसायचे माझी मीच एकटी डायरी लिहीत. ...
ही डायरी मला बाबांनी दिलेली वाढदिवसाची भेट म्हणून. तो शेवटचा एकत्र वाढदिवस. मग पुन्हा कधीच बाबा आमच्यात आले नाहीत. आईला आवडायचं पण नाही ते आलेले, म्हणून मग यायचेच नाहीत कधी भेटायला. आम्ही घरातून निघताना मात्र मला जवळ घेऊन रडले, म्हणाले, "तुझं लग्न बघायचं भाग्य आहे की नाही, नाही ठाऊक! पण बाळा, पाठवणीचं दु:ख अनुभवतोय..." अर्थ कळायचं वय नव्हतं तेव्हा, पण वाक्य लक्षात राहण्याइतपत मोठी होते मी. अर्थात माझ्या समोर रडणारे बाबा, मी प्रथमच पहात होते.
मी आणि आई बाहेर पडलो, तेव्हा ही डायरी मी हळूच ठेवली माझ्या पिशवीत.
आईपण छानच होती माझी! दोघेही छान होते, पण हा मधे कोणता "पण" आला ते कळलंच नाही कधी. मोठेपणी आईला विचारलं एक दोनदा पण "तो विषय संपला" अस म्हणून गप्प बसायची. मग जेवायची देखील नाही त्या दिवशी, म्हणून मीच विचारणं सोडून दिलं....
माझी आजी कधी कधी आईला म्हणायची, "नातं अस तोडू नये, एक चूक किती काळ धरुन ठेवायची?"
आईचे डोळे पाण्याने भरायचे, पण ती बोलायची काहीच नाही, नुसतीच मला जवळ घेऊन बसायची मग.
आई छान होती, आवडत होती तरीदेखील थोडा राग यायचा तिचा. तिच्यामुळे मला असं बाबांशिवाय रहावं लागतं म्हणून. कॉलेजमधे गेले तेव्हा अजूनच बंडखोर झाले मी. आईशी भांडून बाबांकडे जाऊन राहिले काही दिवस! पण त्यांनी मधल्या काळात दुसरं लग्न केलं होतं. मला नाही जमलं तिला आई म्हणणं. कितीही भांडून, बंड करुन आले असले बाबांकडे तरीही! जुने बाबा थोडे हरवलेच होते! की मलाच तसं वाटलं देव जाणे... मग परत एकदा आईकडे आले.
तिने एका शब्दानेही विचारल नाही "तिथे काय झालं? परत का आलीस?" म्हणून. बरंच झालं म्हणा! आमचं परत एकदा जुनं रुटीन सुरु झालं. मी शेवटच्या वर्षाला असताना आई गेली आणि तिची बाजू नीटपणे माझ्या समोर येण्याआधीच त्याला पूर्णविराम मिळाला.
कॉलेज संपल्या संपल्या माझ्या लग्नाचं बघायला सुरुवात झाली. माझ्या लग्नात मामाने कन्यादान केलं. "ह्यांच" स्थळ शेजारच्या काकूंच्या माहितीतलं म्हणून फ़ारशी चौकशी न करता झटपट लग्न झालं आमचं. "हे" दिसायला सुंदर, शिक्षण नोकरी पैसा-अडका ह्या सर्वच बाबतीत उजवी बाजू. माझं रूप ह्या एका गुणा(?)मुळे आमच लग्न जुळलेलं.
"लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो हो" असं कौतुक झेलत माप ओलांडलं तरीही "आई वडील नाहीत तर कसले मानपान हो, आता वर्षसणही असेच .." हे कळ आणणारं वाक्य कोणीतरी बोललेलं ऐकू आलंच! दुधात मिठाचा खडा पडावा तसं. लहानपणापासूनच अशा काही वाक्यांची सवय झाल्याने मनाला ते टोचणं सवयीचं झालेलं इतकंच.
ह्यांनी कधी तसं जाणवू दिलं नाही, पण काही बाबतींत फारच विचित्र वागायचे. साधी पावडर लावली तरी "कुणासाठी नटत्येस?" असं विचारुन संशय घ्यायचे. बाहेर जाताना "कधी जाणार? कुठे जाणार? कोण बरोबर आहे? किती वाजता येणार परत?" सगळा सेकंदा-सेकंदाचा हिशोब द्यावा लागायचा. हे काळजीपेक्षा अधिक काही आहे हे जाणवायचं. कोणी माझं कौतुक केलेलं चालायचं नाही, कोणत्याही बाबतीत मी वरचढ ठरलेलं खपायचं नाही.... येव्हढं सोडता, बाकी चांगलेच होते. मी आजारी पडले की रात्र रात्र उशाशी बसून रहायचे. स्वत:च्या हाताने भरवायचे. कामं देखील करु द्यायचे नाहीत!
माधवीच्या वेळेस डोहाळे कडक लागले होते, तर फुलासारखं जपलं होतं त्यांनी. घरात मोठं माणूस नव्हतं काळजी घ्यायला, पण मामाकडे न पाठवता स्वत:च सगळी देखभाल केली. पण ते सगळं त्यांच्या पद्धतीने, ते ठरवतील तसंच. ते म्हणतील ती पूर्व म्हटलं की सगळंच आलबेल.
मधल्या काळात मी नोकरी करत नव्हते. मन हलकं करायला मग पुन्हा लिखाणाकडे वळले. माझ्या लिखाणाचं कौतुक करायचे, तरीही जाणवायचं, "ते कौतुक करतात माझ्या लिखाणाचं, पण दुसर्या कोणी तसं कौतुक केलेल नाही खपायचं!". तिथे कबूल करायचे नाहीत "इगो" दुखावतो ते, पण काहीतरी कारणं काढून धुसफ़ुसत रहायचे....
सुरुवातीला गोड बोलून बघितलं, पण मुळात असं काही आहे असं मानायचेच नाहीत. सगळे आले की मात्र मुद्दाम बोलवायचे बाहेर आणि सांगायचे, त्यांना किती कौतुक आहे ते. आत कुठेतरी सलायचा हा देखावा. पण जगाला दाखवता येणारं अस दु:ख नव्हतंच काही, मग काय सांगायचं कुणाला?
माहेर असं नव्हतंच, म्हणून कोणाशी बोलणार हे सल? आतल्या आत दाबत गेले इतकंच. किती वेळा विचार यायचा, असला कसला हा संसार? पण डोळ्यासमोर छोटी मी यायचे, हातात डायरी घेऊन बसलेली. माधवी आणि मधुकरवर ती वेळ येऊ नये, म्हणून पायात बेड्या पडल्यासारखी दचकून मागे व्हायचे!
मुलं मोठी होत गेली तसं त्यांनाही जाणवायला लागला स्वभावातला हा फ़रक.
"आई तू का झुकतेस नेहमीच?" १४ वर्षाच्या बंडखोर मधूने मला विचारल होतं.
"मग काय करायला हवं होतं?" ह्या माझ्या प्रश्नावर "वेगळं व्हायचंस", नाहीतर "अरे ला कारे तरी करायचस कधीतरी..." असं उत्तर देऊन मोकळी झाली होती.
"सोप्पं होतं का गं ते, एकदा आईवडिलांच्या संसाराची फरफट बघितल्यावर?" माझी लहानपणी झालेली कोंडी अनुभवल्यावर असं विचारावसं वाटूनही मी गप्प राहिले.
आताशा गप्प रहाण्याची सवयच झालेय म्हणा.... "मला भांडण तंटा नकोय आणि तुम्हीही माझ्यासाठी, माझ्यावरुन वाद नका घालू पिल्लांनो..." येव्हढंच कसबसं म्हणू शकले मी तिला.
माधवी लग्न होऊन सासरी गेली. माधवी, मधुकर दोघांची आयुष्यं मार्गी लागली. ह्यांच्या कर्तव्यपूर्तीत अजून एक शिरपेच खोचला गेला. मी तशीच "लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे हो..." ह्या शब्दाला धरुन राहिले.
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस, ५० वा. किती वर्ष गेली नाही अशीच! आता हेदेखील पूर्वीचे "हे" राहिलेले नाहियेत. कान - डोळे साथ सोडून चाललेत. मग ही म्हातारी, काठी म्हणून लागते सोबत. स्वभावासकट सोबतही सवयीची झालेय माझ्या.
बाहेर तो नातवाने फ़ोटोंचा स्लाईड शो का काहीतरी लावलाय, तसाच एक आत मनात उमटतोय इतकच.
आता इतक्या वर्षांनंतर कसला आलाय खेद आणि खंत? पार पलिकडे गेलंय मन त्याच्या. वेगळी होऊनही आई कुठे सुखी झाली? नी एकत्र राहूनही मी असं काय साधलं मोठं? काहीच नाही म्हणा, किंवा सगळं भरुन पावलं म्हणा. सगळा दृष्टीचा भ्रम, झालं.....
"आS ई! अण्णा..SS ! इकडे बसा.." लेकाने हाताला धरुन मुद्दाम सजवलेल्या खुर्चीवर बसवलं. सुनेने आग्रह करुन करुन खास ह्या समारंभासाठी घेतलेल्या पैठणीची घडी मोडायला लावलेय आज. मोत्याचा सेट पण घालायला लावलाय. "तू मुद्दाम जगाला दाखवायला नटतेस" अस म्हटल्यामुळे कपाटाचं धन झालेला हाच तो मोत्याचा सेट. माझी जुनी पैठणी तर कधीचीच विरली तशीच. मी धूसर दिसणार्या डोळ्यांनी आजुबाजुला बघितलं.
"आSS जी! इकडे बघ! से चीSSSज...!"
"ए आजी ! तो क्यूटसा मोत्याचा सेट जरा बाहेर काढ ना... फ़ोटोत झाकला जातोय पदराने..."
"आजी आजोबा थोडं क्लोज बसाना, नी थोडं अजून स्माईल द्या..... "
"आई नाव घ्या!"
"छे गं! नाव बिव काय आता घ्यायच?" मी ह्यांच्याकडे हळूच बघत म्हटलं...
तेव्हा ह्यांनी मधुकरला जवळ बोलवून काहीतरी सांगितलं. नातवंडांच्या ह्या गलक्यात मग मधुकरने घोषणा केली, "आता अण्णांना काही बोलायचंय..."
सगळे शांत बसले. ह्यांनी बोलायला सुरुवात केली....
सुरुवातीची औपचारिकता संपवून ह्यांनी आमच्या सुखी संसारावर एक कविता म्हटली, नी त्यात चक्क माझेही आभार मानले! म्हटलं, चला! भरुन पावल! सगळेच भ्रम नसतात म्हणायचे!
रात्री निजताना ह्यांनी विचारलं, "काय. कसं वाटलं आजचं आभार प्रदर्शन?" दोन दिवस पाठ करत होतो! त्या जेष्ठ सेवा संघातल्या नान्याकडून लिहून घेतलेलं.... झाल की नाही फ़र्मास?"
"हो छान झालं." मी सवयीने म्हटलं.
"आराम कर आता. उद्या तुझे डोळे तपासायला जायचंय मोतिबिंदूसाठी..." हे म्हणाले नी घोरायला देखील लागले!
"खरंय! माझी दृष्टी दगा देते खरी... " मी त्यांच्या अंगावरचे पांघरुण नीट करत म्हटले,नी पुन्हा एकदा डोळे मिटून घेतले.....

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)